अभिनेता सैफ अली खानची ‘ऑनस्क्रीन’ मुलगी फोटोंमुळे डेब्यूआधीच चर्चेत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार पूजा बेदीची अलिया फर्निचरवाला सध्या आपल्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. कारण हा सिनेमा अलियाचा डेब्यू सिनेमा आहे. या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. या सिनेमात सैफ अली खान, तब्बू आणि अलिया प्रमुख भूमिकेत आहेत. अलियानं या सिनेमात सैफच्या मुलीची भूमिका साकारली आहे. तब्बूनं अलियाच्या आईची भूमिका साकारली आहे.

जवानी जानेमन सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर सिनेमाचा ट्रेलर आणि काही गाणीही रिलीज करण्यात आली आहेत ज्यांना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा सिनेमा आलिया अगोदर सारा अली खानला ऑफर झाला होता. याबाबत खुद्द सैफनंच एका मुलाखतीत सांगितलं होतं.

ट्रेलरमध्येही दिसत आहे की, अलियानं एका बोल्ड मुलीची भूमिका साकारली आहे. अलिया रिअल लाईफमध्ये देखील खूप हॉट दिसते. सध्या पदार्पणाआधीच अलिया चर्चेत आहे. सोशलवर तिची जोरदार चर्चा सुरू आहे.

अलिया सोशलवर सक्रिय असते. आपले अनेक बोल्ड फोटो तिनं सोशलवरून शेअर केले आहेत. सोशलवर तिची मोठी फॅन फॉलोविंग आहे. आलियाच्या बोल्ड लुकची अनेकदा चर्चा झाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –