Jayant Patil | नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार?, जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Jayant Patil | मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेनंतर राज्यातील विरोधी पक्षाने मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी राजीनामा द्यायचा मग राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांनी का नाही?, असा सवालही भाजप नेत्यांनी केला होता. अशातच यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

 

विरोधकांना कितीही गोंधळ घालायचा तो घालूदेत मात्र नवाब मलिक यांचा राजीनामा (Resigned) घेण्याची गजर नाही हे आम्ही याआधीही स्पष्ट केलं आहे. आताही आम्ही हेच सांगत आहोत, असं जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना पाटलांनी विरोधी पक्षाला (Opposition) टोलाही लगावला.

 

भाजप (BJP) नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप (False accusations) करत त्यांचा राजीनामा मागत आहे.
खोटे-नाटे आरोप करायचे गोंधळ घालायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या वेळी ते जाहीर करायचे ही भाजपची कार्यपद्धती असल्याचं पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी पक्षाची शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली.
या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते, मंत्री आणि खासदार उपस्थित होते. या बैठकीनंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना मलिकांच्या राजीनाम्याबाबतची माहिती दिली.

 

दरम्यान, विरोधी पक्षाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Assembly session) याचे पडसाद उमटणार असल्याचा इशारा ठाकरे सरकारला दिला आहे.
चहापानाला विरोधकांना बोलावल्यावर ते बहिष्कार टाकणार हे आम्हाला माहित आहे.
मात्र त्यांनी चहापानाला यावं, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.

 

Web Title :- Jayant Patil | jayant patil said we decided that no resignation of nawab malik no matter how much create ruckus maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Amol Mitkari | “युक्रेनमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्युच्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत पंतप्रधान मोदी राजीनामा देण्याचं धाडस दाखवतील का?”

 

Devendra Fadnavis | ‘दाऊद इब्राहिमशी व्यवहार करणाऱ्याला वाचवण्यासाठी ठाकरे सरकारचे प्रयत्न सुरू’ – देवेंद्र फडणवीस (Video)

 

Fatty Liver Symptoms | लिव्हर खराब झाल्यास तोंडातून येते भयंकर दुर्गंधी, लवंग-वेलची खाण्याऐवजी ताबडतोब जा डॉक्टरकडे