Amol Mitkari | “युक्रेनमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्युच्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत पंतप्रधान मोदी राजीनामा देण्याचं धाडस दाखवतील का?”

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Amol Mitkari | रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine war) चालू असलेल्या युद्धात भारतामधील एका विद्यार्थ्याचा मृत्यु झाला. नवीन शेखरप्पा (Navin Shekhar Appa) असं संंबधित विद्यार्थ्याचं नाव होतं. रशियन सैनिकांच्या गोळीबारात त्याचा मृत्यु झाला. मात्र यावरून राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी राजीनामा देण्याचे धाडस दाखवतील का ?, की फक्त “मन की बात” मध्ये श्रद्धांजली वाहत बसतील ?, असा सवाल करत अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

शेखरप्पा हा युक्रेनमध्ये खार्कीव्ह (Kharkiv) या शहरामध्ये शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेला होता. खार्किव्ह नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये (Medical College) एमबीबीएसच्या (MBBS) चौथ्या वर्षात शिकत होता. सकाळच्या सुमारास सुपरमार्केटजवळ रशियन सैनिकांनी जोरदार गोळीबार (Firing) केला त्यावेळी शेखरप्पा ही तिथेच होता. त्या गोळीबारामध्ये त्याचा मृत्यु झाला.

 

दरम्यान, अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेवर भाजप (BJP) नेते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नवीनच्या मृत्युनंतर पंतप्रधान मोदींनी त्याच्या वडिलांना फोन केला होता.

 

Web Title :- Amol Mitkari | Will Prime Minister Modi dare to accept moral responsibility for the student death in Ukraine

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा