Jayant Patil | ‘राज्यातील सरकार साम-दाम-दंड-भेद वापरून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय’ – जयंत पाटील

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड (Dr. Jitendra Awhad) यांनी पोलिसांच्या गैरवापराला आणि शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis Government) सरकारच्या दडपशाहीला कंटाळून आपण राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या धोरणाविषयी कोणी बोलले, तर त्याला अटक कशी होईल, असा सत्ताधाऱ्यांचा मनसुबा आहे. पण, आम्ही काट्यातून वाट काढत पुढे जाऊ, असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ दोन ट्वीट केली आहेत. त्यात ते म्हणतात, “मुद्दे नसले की गुद्द्यांवर येऊन प्रत्येक वेळी नवा विषय उकरून काढत विरोधात बोलणाऱ्याला अटक कशी होईल, हाच मनसुबा सत्ताधाऱ्यांचा आहे. मात्र, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी वाटेतील काट्यांशी लढत आम्ही पुढे जाऊ. कारण, महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद आणि विश्वास आमच्या पाठीशी आहे.” तसेच “राज्यातील जनतेचा अकार्यक्षम सरकारविरोधातील आक्रोश वाढला की स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आणि विरोधकांनी आवाज उठवला की त्यांची तोंडे बंद करण्यासाठी, केंद्रीय तपास यंत्रणा, राज्यातील पोलीस यंत्रणा यांचा वापर करून दडपशाही सुरु आहे.” असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

ठाण्यातील विवियाना चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) चित्रपटाचा प्रयोग जितेंद्र आव्हाड
(Jitendra Awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला होता. तसेच त्यांच्याकडून काही प्रेक्षकांना
मारहाण देखील झाली होती. त्यामुळे आव्हाडांना अटक करण्यात आली होती.
त्यावर त्यांची जामीनावर सुटका देखील करण्यात आली होती.
त्यानंतर ते प्रकरण शांत होते न होते तोपर्यंत मुंब्रा पोलीस ठाण्यात (Mumbra Police Station)
आव्हाडांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.
रीदा रशीद (Rida Rashid) नावाच्या महिलेने आव्हाडांना खांद्याला हात लावून आपल्याला बाजूला केले
म्हणत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. ही महिला भाजपशी संबंधित आहे.
त्यामुळे आव्हाडांनी आपल्याला या सर्वांचा त्रास होत असून, राजीनाम्याची घोषणा केली होती.
त्यांना राजीनामा न देण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि
अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे.

Web Title :-  Jayant Patil | jitendra awhad molestation case sharad pawar led ncp jayant patil slams eknath shinde devendra fadnavis saying those who speak against govt gets into trouble

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kirit Somaiya | जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पोलीस गुंडानी केलेल्या कृत्याची आव्हाड माफी मागणार का? – किरीट सोमय्या

Katrina Kaif Pregnant | कतरिना कैफ आहे प्रेग्नंट?, व्हायरल फोटोंमध्ये दिसत आहे बेबी बंप