Jayant Patil | भाजपला उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अन्यथा त्यांना…, जयंत पाटलांचा भाजपला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने (BJP) अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत (Andheri By-Election) माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे- Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपला टोला लगावला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केलेल्या आवाहनानंतर भाजपला उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे, असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

 

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नागपूरात पत्रकार परिषदेत भाजप या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर राष्ट्रवादीकडून भाजपच्या या राजकारणाचा समाचार घेतला गेला आहे. राज्यात गेले काही दिवस राजकीय नाट्य सुरु होते. ऋतुजा लटके यांचा राजीनामा (Resignation) मंजूर न करणे, त्यांना नाईलाजाने न्यायालयात जावे लागणे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावणे, हे अत्यंत क्लेशदायक होते. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) आणि नाव गोठविण्यात आले. शरद पवार यांनी या निवडणुकीसंबंधी केलेल्या आवाहनानंतर भाजपला उशिरा शहाणपण सुचले, अन्यथा भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले असते, असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

भाजपने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची मदत मागितली होती.
त्याला राज ठाकरे यांनी नकार दिला होता. तसेच राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन देखील केले होते.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेत ही निवडणूक बिनविरोध करण्यास सांगितले होते.
अखेर भाजपने आपाला उमेदवार मागे घेण्याचे जाहीर केले आहे.

 

Web Title :-  Jayant Patil | ncp jayant patil on andheri by poll election murji patel withdraws candidature

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kishori Pednekar | ‘हे भाजपला उशिरा आलेले शहाणपण’, पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्यावर किशोरी पेडणेकर यांचा हल्लाबोल    

Chitra Wagh | चित्रा वाघ यांचे खासदार सुळेंना प्रत्युत्तर, म्हणाल्या – ‘भाजपाची काळजी सोडा सुप्रियाताई…, A for अमेठी, B for…’

Andheri By-Election | राज ठाकरेंच्या पत्रानंतर भाजपाची माघार, मनसेने प्रतिक्रिया देताना म्हटले – ‘जर हा निर्णय…’