Jayant Patil On Modi Ki Guarantee | ‘मोदी की गॅरंटी’वर जयंत पाटील यांची बोचरी टीका, ”चले तो चांद तक, नही तो शाम तक”

नाशिक : Jayant Patil On Modi Ki Guarantee | काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे (Bharat Jodo Nyay Yatra) आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आगमन झाले. यावेळी महाविकास आघाडीतील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाच्या मोदी की गॅरंटी कॅम्पेनवर जोरदार टीका केली.

जयंत पाटील म्हणाले, सध्या सर्वत्र मोदी की गॅरंटी असे कॅम्पेन सुरू आहे. जाहिरातींमध्ये याचा प्रचार केला जातोय. पण भाजपच्या गॅरंटीची परिस्थिती चायनीज मालासारखी आहे. चले तो चांद तक, नही तो शाम तक असा हा प्रकार आहे.(Jayant Patil On Modi Ki Guarantee)

ते पुढे म्हणाले, देशात शेतकरी सर्वात अस्वस्थ आहे. यापूर्वी देशातील शेतकरी दिल्लीच्या दारात बसला असताना सातशे पेक्षा जास्त शेतकरी मृत्यूमुखी पडले. पण दिल्लीचे सरकार हलले नाही. आता पुन्हा एकदा शेतकरी बांधव शेतमालाच्या आधारभूत किंमतीसाठी लढत आहे. इतर कसली नको पण आधारभूत किंमत मिळण्याची गॅरंटी आम्हाला द्या.

जयंत पाटील म्हणाले, कांद्याचे भाव पडलेत. निर्यात बंदी उठवण्याची दानत सरकारची नाही.
केळी, संत्री बांगलादेशमध्ये निर्यात करता येत नाही. द्राक्षाची काही वेगळी अवस्था नाही. सोयाबीनचे दर पडलेत.
सत्तेवर येण्याआधी जे कापसाला दहा हजार रुपये मागत होते, सोयाबीनला सहा हजार रुपये मागत होते ते लोक
आता काहीच बोलत नाहीत. देशभरातील शेतकऱ्यांनी आता संघटित व्हायला पाहिजे.

जयंत पाटील म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारतभर सुरू असलेली पदयात्रा टिव्हीवर, मोबाईलवर कुठेच
दिसत नाही. कारण तुमच्या पर्यंत काय पोहचवायचे हे ठरलेले आहे. जे त्यांना सोयीचे आहे तेच लोकांना दिसते.
त्यामुळे सत्य पुढे येतच नाही. घराघरात बेकारी, महागाई आहे. शेतीमालाच्या दराचा प्रश्न आहे.
म्हणून सर्वसामान्य लोकांनी, शेतकऱ्यांनी जागरूक झाले पाहिजे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Muralidhar Mohol – MLA Ravindra Dhangekar | पुण्यात मोहोळ विरूद्ध धंगेकर सामना रंगणार?, काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष

Mahavikas Aghadi-Lok Sabha Election 2024 | ”महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण, ४८ लोकसभा मतदारसंघांची…”, संजय राऊत यांची महत्वाची माहिती

NCP Sharad Pawar On Modi Govt | ”भाजपाच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट”, शरद पवार यांचा मोदी सरकारवर आरोप