Jayant Patil | ‘वाझे प्रकरणात ‘1 नंबर’ म्हणजे मुंबईचे पोलिस आयुक्तच

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –  Jayant Patil | मागील काही दिवसापासून राज्यात पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस दलात असणारे आणि सध्या बरखास्त केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze), आणि मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या प्रकरणामुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं. यावरून ED आणि CBI चौकशीत वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविषयीचा अहवाल समोर आल्यानंतर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
‘खाकी वर्दी घातलेले 2-3 -लोकच समाजातील विविध घटनांना त्रास देऊन वसुली करत होते.
ते स्वतःसाठीच पैसे गोळा करायचे.
या प्रकरणात ‘एक नंबर’ म्हणजे मुंबईचे पोलिस आयुक्त आहेत.
त्यात अनिल देशमुख यांचा काहीही संबंध नाही.
ते दोषी नाहीत, हे जनतेला कळाले असल्याचं पाटील म्हणाले.

 

पुढं बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी, खासकरून ठाणे, मुंबईतील अनेक व्यावसायिकांनी तक्रारी केल्या.
त्यामध्ये पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) ज्या पद्धतीने खंडणी उकळत होते, त्रास देत होते, याचे वर्णन करण्यात आले होते.
त्याबाबतचे काही टेप सापडले आहेत. त्यात वाझे कुणासाठी पैसे गोळा करत होते.
‘1 नंबर म्हणजे कोण हे स्पष्टपणे सांगितलं असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले, ‘अलिकडेही काही गुन्हे दाखल आहेत. त्यातही संभाषण समोर आलीत. ‘1 नंबर म्हणजे मुंबईचे आयुक्त हे पुन्हा पुन्हा सांगण्यात आले आहे.
त्याचा अर्थ सरळ आहे, ‘1 नंबर अर्थात अनिल देशमुख (Anil Deshmukh) नव्हते, याचा पर्दाफाश झालाय. आहे. ‘1 नंबर म्हणजे मुंबईचे आयुक्तच आहेत.
देशमुख निष्पाप आहे, हे सिद्ध होता असल्याचं पाटील सांगितलं आहे. दरम्यान, आणखी एका संभाषणात एक व्यक्ती समोर आलीय. जी वाझे आणि परमबीर सिंग यांच्याशी संबंधीत आहे.
त्या संभाषात ‘पुढच्या 10-12 दिवसांत एका मंत्र्याला टार्गेट करण्यात आले.
ED-CBI मागे लावणार आहोत, जेणेकरून हे सरकार जाईल आणि पुन्हा आपल्या मनासारखे पोलिस आयुक्त होतील’,अशा आशयाचे संभाषण असल्याचं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : jayant patil speech in anil deshmukh incidence sachin waze case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Shivsena MP Bhavana Gavali | ईडीचा दणका ! शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थांवर ED चा छापा

Pune News | कोरोना नियमाचे उल्लंघन ! पुणे जि. प. माजी अध्यक्षांसह कार्यालयाच्या मालकावर गुन्हा

CBSE ने बोर्ड परीक्षा पॅटर्नमध्ये केला मोठा बदल, यावर्षी दोन टप्प्यात होईल परीक्षा