आघाडी धर्म न पाळल्यास कर्नाटक सरकार पडेल : देवेगौडा 

बंगरुळु : कर्नाटक वृत्तसंस्था – कर्नाटकात आघाडी धर्माचे पालन केले नाही तर सरकार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे माजी पंतप्रधान आणि जेडीएस प्रमुख एच. डी. देवेगौडा यांनी म्हणले आहे. आपणच श्रेष्ठ असल्याचा हेका आपल्या दोन्ही पक्षांना महागात पडेल आणि राज्याच्या सत्तेत जातीवादी पक्ष आघाडी घेतील त्यामुळे काँग्रेस आणि  जेडीएस या दोन्ही पक्षाने आघाडी धर्माचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले आहेत.

जातीवादी पक्षांची शक्ती वाढत चालली आहे. ते आपणामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मनसुब्याला कित्पद बळी पडायचे हे आपल्या हातात आहे असे देवेगौडा म्हणाले आहेत. जेडीएसचे ज्येष्ठ नेते बसवराज होर्ती यांनी केलेल्या आरोपाच्या संदर्भाने देवेगौडा बोलत होते. होर्ती यांनी काँग्रेस नेत्यांवर आरोप करत काँग्रेस नेते कुमार स्वामी यांना नीट काम करू देत नाहीत असे म्हणले होते. अशाने आघाडी धर्म हे तुटण्याचा संभव नाकारता येणार नाही. त्याच प्रमाणे लोकांच्या कामाशी प्रामाणिक राहून आपल्याला काम करायचे आहे असे हि देवेगौडा यांनी म्हणले आहे.

बसवराज होर्ती यांनी सिद्धरामय्या यांच्यावर सौम्य शब्दात टीका करत म्हणले होते, त्यांना कुमार स्वामी यांच्या योजना राबवू वाटत नाहीत असे हि बसवराज होर्ती म्हणाले होते. कोणत्या ही व्यक्तीला असेच वाटत असते कि आपल्या योजना नव्या सरकारने बंद करू नये, म्हणून त्यांनी हि कदाचित कुमार स्वामी यांच्या योजनांना विरोध केला आहे.

कुमार स्वामी यांच्या मंत्रिमंडळाचा झालेला विस्तार कुमार स्वामी यांना चांगलाच भोवला आहे. त्यांच्या पक्षातील तसेच काँग्रेस मधील नाराज आमदार काँग्रेस-जेडीएस आघाडीच्या सरकारला घातपात घडवून आणतील असे हि बोलले जाते आहे. तर तिकडे भाजपच्या एका आमदाराने नव्या वर्षात नवे सरकार कर्नाटकात येते आहे असे सूचक विधान केले होते. या विधानाने देखील काँग्रेस आणि  जेडीएस नेते चिंतीत आहेत.

भाजप नेता असल्याचे सांगताच पोलिसांनी आणखी चोपले