JEE Mains Exam | JEE Mains परीक्षेच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  बहुप्रतीक्षित JEE Mains या परीक्षांच्या तिसऱ्या आणि चौथ्या (3rd and 4th phase) सत्राची तारीख मंगळवारी (दि.6) जाहीर करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने JEE Mains ही परीक्षा चार सत्रात घेण्यात येत आहे. पहिली परीक्षा फेब्रुवारी तर दुसरी मार्चमध्ये घेण्यात आली होती. आता केंद्र सरकारनं तिसऱ्या आणि चौथ्या सत्रांसाठी परीक्षांच्या तारखा (Exam Dates) जाहीर केल्या आहेत.

JEE Mains च्या तारखा

जेईई मेन्स चं तिसरं सत्र 20 ते 25 जुलै दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. तर चौथे सत्र 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक (Dr. Ramesh Pokhriyal Nishank) यांनी आज जाहीर केलं आहे.

शिक्षण मंत्र्यांचे विद्यार्थ्यांसाठी ट्विट

प्रिय विद्यार्थ्यांनो, ज्यासाठी तुम्ही सर्वजण बराच काळ वाट पहात होते, आज संध्याकाळी 7 वाजता मी तुम्हाला सर्वांना JEE च्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील परीक्षेसंबंधी माहिती देईन, असं ट्विट केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी केलं होतं. त्यानुसार त्यांनी आज ही घोषणा केली आहे. तसेच जेईई मेन्स च्या परीक्षांच्या तारखांची आता घोषणा करण्यात आली म्हणून आता विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याचं आणि तयारी करण्याचं आवाहन शिक्षणमंत्र्यांकडून करण्यात आले आहे.

Web Title: JEE Mains Exam | dates of jee mains exams revealed by central education minister

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

CM Uddhav Thackeray । भाजप-शिवसेना पुन्हा युती होणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

Anti Corruption Trap | 10,000 लाच मागितल्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकासह 2 पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Ahmednagar Crime News । वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टरने लसीकरण केंद्रातच घेतला गळफास; पाथर्डी तालुक्यातील धक्कादायक घटना