गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको? मग ‘हे’ पाणी प्या

पोलिसनामा ऑनलाइन टीम – बाळंतपणानंतर महिलांनी स्वताची काळजी घेणे खूप गरजेचे असते. या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. लठ्ठपणा ही बाळंतपणानंतरची सर्वात मोठी समस्या आहे. यासाठी काही घरगुती उपाय करून तुम्ही लठ्ठपणासह अन्य काही समस्या दूर ठेवू शकता. जिऱ्यामधील अनेक घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. गरोदरपणानंतर जिऱ्याचे पाणी पिल्याने अनेक फायदे होतात.

गरोदरपणानंतर स्त्रियांचे वजन वाढते. बहुतांश स्त्रियांना या समस्येचा सामना करावा लागतो. ही समस्या टाळण्यासाठी नियमित जिऱ्याचे पाणी प्यावे. गरोदरपणानंतर तुम्हाला रक्तदाबाची समस्या होऊ शकते. यासाठी जिऱ्याचे पाणी प्यावे. यामुळे हृदयाच्या आजारांपासूनही बचाव होतो. गरोदरपणानंतर अनेक महिलांना दूध कमी येण्याची समस्या होते. ही सामान्य समस्या आहे. अशा वेळी जिऱ्याचे पाणी वरदान आहे. त्याचे नियमित सेवन केल्याने बाळासाठी पुरेसे दूध येईल. गरोदर असताना किंवा गरोदरपणानंतर रक्ताची कमतरता असण्याची समस्या सामान्य बाब आहे. अनेक महिलांना ही समस्या होते. अशा वेळी जिऱ्याचे पाणी नियमित घेतल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/