जेजुरीत औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांना फुटप्रेस हॅन्ड वॉश मशिनची भेट

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – सुरोज मोड्युलर हाऊसिंग प्रा.लि.या कंपनीतर्फे जेजुरी औद्योगिक वसाहतीमधील सर्व कंपन्यांना आज फुटप्रेस हॅन्ड वॉश मशिन भेट देण्यात आल्या. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरोज कंपनीपर्फे खास हा अभिनव उपक्रम राबण्यात आला आहे. कंपनीच्या संचालिका तनुजा बियानी यांच्या संकल्पनेतून ही योजना साकरली आहे.

आज जिमा सभागृहामध्ये सहाय्यक पोलिस निरीकक्षक अकुंश माने यांच्या हस्ते या मशीनचे वितरण करण्यात आले. यावेळी जिमाचे अध्यक्ष डॉ.रामदास कुटे, उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे,खजिनदार रविंद्र जोशी,प्रकाश खाडे,अनंत देशमुख, जालिंदर कुंभार सुरोज कंपनीचे अभियंता सागर स्वामी, रामचंद्र नागरगोजे आदी उपस्थित होते.

जेजुरी नगरपालिका,ग्रामिण रुग्णालय, पोलिस स्टेशन,खंडोबा देवस्थान यांना प्रत्येकी दोन मशिन भेट देण्यात येणार आहेत.या मशिनमध्ये हाताचा वापर न करता पायाच्या सहाय्याने दाब देऊन हॅन्ड वॉश अथवा सॅनिटायजर सहज हातावर घेता येते.यामुळे औद्योगिक वसाहतीमधील सर्व कामगार व जेजुरी पंचकोशीतील नागरीकांना याचा फायदा होणार आहे.सरोज मोड्युलर ही प्रसिध्द कंपनी असून लोखंडापासून साईटवर लागणारी घरे,कार्यालये बनवते.