UP च्या सोनभद्र सारखंच बुंदेलखंडातील ललितपुरमध्ये सोन्याचा मोठा ‘साठा’, कॅनडाच्या एजन्सीनं दिला ‘दुजोरा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बुंदेलखंड म्हणलं की दुष्काळी भाग, बेरोजगारी. असे असतानाच दुसरीकडे या बुंदेलखंडाच्या जमिनीचा गर्भ रत्नांनी भरलेला आहे. या जमिनीत हिरे, सोन्यासहित रॉक फॉस्फेट सारखे बहुमोल खनिजे आहे. यामुळे बुंदेलखंडमधील दुष्काळ, बेरोजगारी यासारख्या समस्या संपतील. देशातील विविध खनिजे तपास संस्था आणि कॅनडाची खनिज सर्वेक्षण संस्था यांनी देखील सोन्याच्या उपलब्धतेचा दावा केला आहे. यानंतर देखील शोधाच्या नावाखाली येथून फक्त सॅम्पलिंगच केलं जात आहे. सोनभद्रमध्ये सोन्याची खाण मिळाल्यानंतर ललितपूरच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, लवकर येथे देखील तपास पूर्ण होईल.

प्रकृतीचे भंडार –
बुंदेलखंडचा ललितपूर जिल्हा विकासाच्या बाबतीत बराच मागे आहे. परंतु प्राकृतिक संपदेचे येथे भांडार आहे. नदी, जंगल यासह येथे बरीच खनिज संपदा आहे. उत्तर प्रदेश खनिकर्म आणि पुरात्वत विभाग तसेच भारतीय भू सर्वेक्षण विभागाद्वारे मडावरा विकास खंडाच्या अनेक भागात 12 पेक्षा जास्त गावात खनिजाचा तपास करण्यात आला. याचे नमुने आग्रा, दिल्ली आणि हैदराबादच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. प्रयोगशाळेत तपासानंतर सोनं, प्लॅटिनम आणि महत्त्वाच्या खनिजांचा शोध लागला. यानंतर कॅनडाच्या संस्थेने देखील खनिज सर्वेक्षण केले. या तपासात मडावरा भागात प्लॅटिनम आणि गिरर क्षेत्रात सोन्याचा भरपूर साठा असल्याचे स्पष्ट झाले.

आजतागायत या क्षेत्रात सॅम्पलिंग केले जात आहे. मागील काही वर्ष पावसामुळे सॅम्पलिंगचे कार्य बंद केले होते. मागील 8 महिन्यांपासून विविध क्षेत्रात खनिज सॅम्पलिंग केले जात आहे. यातून काढण्यात येणारे दगड राज्य स्तरावर कुठेतरी पाठवण्यात येत आहे. परंतु अद्यापही ललितपूर जिल्ह्यात विविध गावातून भू – भागात मशीनद्वारे दगड काढले जात आहेत. कॅनडाच्या भू सर्वेक्षण टीमने जमिनीपासून एक मीटर खोल सोन्याची उपलब्धी असल्याचे सांगितले जात आहे. ही उपलब्धता 25 किलोमीटर लांब आणि 2.5 किलोमीटर रुंद असल्याचे सांगितले जात आहे. परंतु खजिन्यांचा शोध अद्यापही सुरु आहे. सोनभद्रमध्ये खाण मिळाल्यानंतर ललितपूरमधील लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

You might also like