धक्कादायक ! महिलेला गळफास घेण्याचे नाटक पडले महागात; स्टूलवरून घसरून झाला मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  झारखंडमधील धनबादमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिथे 32 वर्षीय तारा देवीला गळफास घेण्याचे नाटक महागात पडले आहे. पोलिसांनी प्रकरण उघडकीस आणले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले.

8 वर्षाच्या मुलीच्या म्हणण्यानुसार, मुलगी आपला लटकणारा फोटो पतीला (वडिलांकडे) पाठवू शकेल म्हणून तिची आई वडिलांना (तिच्या पतीस) धमकावण्याच्या प्रयत्नात होती. पण, प्रकार काही वेगळा घडला होता. गळफासचा फोटो काढताना ताराचा स्टूलवरुन पाय घसरला आणि यातच तिचा मृत्यू झाला.

हे प्रकरण धनबादच्या रामाकनाली ओपी क्षेत्रातील रामकानली फिल्टर प्लांट जवळ घडले आहे. जेथे पती मनोज महतो यांचे ताराबरोबर दुसरे लग्न झालेले आहे. तारा आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन तिनं लग्न केलं होतं. त्याचवेळी ताराची आई गौरी देवीने सांगितले की, ताराचे हे दुसरे लग्नही होते. त्याने हे पाऊल संपूर्ण कुटुंबाच्या विरोधात उचलले होते. पण, मनोजलाही त्याच्याकडून आनंद मिळाला नाही, म्हणून त्याने आत्महत्या केलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराचा एक व्हिडिओही सापडला आहे. ज्यामध्ये ती म्हणत आहे की, संपूर्ण कुटुंब विरोध दर्शवत होते तरीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा माणूसही तसाच निघाला. मनोजला आठ वर्षांची मुलगी असून ती मनोज आणि तारासमवेत राहत होती.

याबाबत मुलगी सांगते की, वडिलांना घाबरायच्या उद्देशाने आईने गळफास घेण्याचा पर्याय निवडला. हँगिंग फोटो पाठविल्यानंतर वडील घाबरतील, असे आईने म्हटले होते. गळफास घेताना आईचा पाय स्टूलवरून घसरला आणि मृत्यू झाला.

मुलगी म्हणाली की, खूप आरोडा ओरडा करूनही लोक जवळ आली नाहीत. मग, बाहेर जाऊन लोकांना बोलावले. पण, तोपर्यंत आईचा मृत्यू झाला होता. यानंतर ही बाब पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे रामाकनाली पोलिसांचे म्हणणे आहे.