सभागृह परिसरात विधेयकाची प्रत जाळली, आमदार जिग्नेश मेवाणी गुजरात विधानसभेतून ‘निलंबित’ (व्हिडिओ)

अहमदाबाद : वृत्तसंस्था – गुजरातच्या वडगाव मतदारसंघातील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी विधानसभा सभागृह आवारात विधेयकाची प्रत जाळल्याने गोंधळ उडाला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी विधेयक गुजरात विधानसभा सभागृहात मांडण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच जिग्नेश मेवाणी यांनी विधानसभा परिसरात या विधेयकाची प्रत जाळली. गुजरात विधानसभेच्या इतिहास ही पहिलीच घटना आहे.

जिग्नेश मेवाणी यांना गुजरात विधानसभा अधिवेशनातील तीन दिवसांच्या कामकाजासाठी निलंबित करण्यात आले आहे. संविधानाच्या मुद्यावरून जिग्नेश यांनी विधानसभेत आक्रमक भाषण केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि विधानसभा अध्यक्षांना संविधानाच्या मुद्यावरील विसंगतीवरून प्रश्न विचारले होते. गुजरात विधानसभा सभागृहातील तीन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संविधान दिन साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी ठेवला होता. मात्र, त्याला मेवाणी यांनी विरोध केला होता.

विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी सभागृहातील बेशिस्त आणि गैरवर्तुणकीचा दाखला देत जिग्नेश मेवाणी यांना तीन दिवसांसाठी निलंबित केले आहे. यावर प्रतिक्रीया देताना जिग्नेश मेवाणी म्हणाले, मला विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे, अन्यथा मी सभागृहातच ही प्रत जाळली असती, असे मेवाणी यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले.

Visit : Policenama.com