Jignesh Mewani-Reshma Patel | आमदार जिग्नेश मेवानींसह राष्ट्रवादीच्या महिला नेत्यालाही कारावासाची शिक्षा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Jignesh Mewani-Reshma Patel | गुजरातचे काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Mewani) यांना ट्रायल कोर्टाकडून 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2017 मध्ये मेवाणींनी मेहसाणा येथे परवानगीशिवाय रॅली काढली होती. त्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली. तर, या प्रकरणात जिग्नेश यांच्याशिवाय राष्ट्रवादीचे नेते रेश्मा पटेल (NCP Leader Reshma Patel) आणि सुबोध परमार (Subodh Parmar) यांनाही 3 महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. (Jignesh Mewani-Reshma Patel)

 

जिग्नेश मेवाणी यांच्यासह एकूण 12 जणांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना एक हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. मेवाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2017 साली मेहसाणा ते बनासकांठा (Mehsana to Banaskantha) जिल्ह्यातील धानेरापर्यंत ‘आझादी मोर्चा’ चे नेतृत्व केले होते. (Jignesh Mewani-Reshma Patel)

दरम्यान, ‘रॅली काढणे हा गुन्हा नसून परवानगीशिवाय रॅली काढणे हा गुन्हा आहे,’
असे निरीक्षण अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.ए.परमार (Additional Chief Justice J.A. Parmar) यांच्या न्यायालयाने नोंदवलं आहे.
कौशिक परमार (Kaushik Parmar) याने मेवाणी यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय दलित अधिकार मंच
या संघटनेच्या बॅनरखाली रॅलीसाठी मेहसाणा कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली होती.
त्यासाठी प्रथम परवानगीही देण्यात आली होती, मात्र ती पुन्हा मागे घेतली आहे.

 

Web Title :- Jignesh Mewani-Reshma Patel | congress mla jignesh mevani ncp leader reshma patel and 11 others sentenced to three months in jail for rally without permission by mehsana court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा