‘जीजी माँ’ मालिकेतील नियती पुरोहितने केला हा थरारक स्टंट… 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – टीव्ही मालिकांच्या पडद्यावरील सहज साधा आणि सोपा अभिनय पाहताना असा अभिनय करण्यासाठी कलाकारांना किती अडचणींना सामोरे जावे लागत असेल, याबाबद प्रेक्षक अनभिद्न्य असतात पटकथेच्या मागणीनुसार या कलाकारांना कधी कधी काही थरारक, स्टंट प्रसंग साकारावेच लागतात, जे की त्यांनी यापूर्वी कधीच केलेले  नसतात एव्हाना त्यांना तशा प्रसंगांची सवय देखील नसते. ‘स्टार भारत’ या वाहिनीवरील ‘जीजी माँ’ मालिकेत नियती पुरोहित या नायिकेची भूमिका साकारणारी

अभिनेत्री भाविका शर्माने अपहरणाच्या दृश्याचे चित्रीकरण करताना आपल्या आयुष्यातील सर्वांत थरारक आणि भीतीदायक असा स्टंट केला आहे.

हा प्रसंग असा आहे. की  नियतीला किडनॅपर्स अडवत असतात त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी ती पळून जाण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर  किडनॅपर्स तिला पकडतात पकडल्यानंतर  तिला जमिनीपासून १५० फूट वर बांधतात.नुसते वर बांधत नाहीत तर ते तिचे हात आणि तोंडही बांधतात तिला पळून जाण्यासाठी काहीच संधी उरत नाही.

अशाप्रकारचे थरारक दृश्याचे चित्रीकरण ती प्रथमच चित्रीत करत होती. यासाठी भाविकाला खरोखरच स्वतःचे मन घट्ट करण्याची  गरज होती. कारण एवढ्या उंचीची तिला सवय नसल्याने तिला त्याची अत्यंत भीती वाटत होती. १५० फूट उंचीवरील क्रेनला हात आणि तोंड बांधून अडकवलेले असणे या दृश्याचे चित्रीकरण करणे भाविकासाठी खरंच एक मोठे शारीरिक आणि त्याचबरोबर मानसिकही आव्हान होते.भाविकाने अति उत्साहाने या चित्रीकरणासाठी होकार दिला,मात्र  “त्या क्रेनला पाहून त्यावर मला बांधले असल्याचे दृश्य इमॅजिन करून मला वाटले की आता मी काही परत येत नाही. मला उत्साहही वाटत होता. आणि भीतीसुद्धा कारण असा अनुभव या आधी मी कधीच घेतला नव्हता. पण हे साकारताना मला काही समस्या आली नाही तो व्यवस्थित पार पडला याचा मला जास्त आनंद आहे. माझ्यासाठी ते एखाद्या मोठ्या साहसापेक्षा कमी नव्हते.