Airtel ला रोखण्यासाठी Reliance Jio ची जबरदस्त प्लानिंग, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने बाजारपेठेत आपल्याला अन्य कंपन्यांच्या तुलनेत सर्वात पुढे राहण्यासाठी जबरदस्त प्लानिंग केली आहे. जिओची आक्रमक रणनीती यशस्वी झाली तर जिओ अन्य कंपन्यांच्या पुढे राहण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही.

रिपोर्टमध्ये म्हटले की, प्रतिस्पर्धीमध्ये चांगल्या स्थानावर राहण्यासाठी भारती एअरटेलचा मोबाइल ब्रँड ग्राहकांचा मोठा भाग आपल्याला जोडण्यासाठी प्रय़त्न करणार आहे. जिओची उच्च आवृत्तीच्या बँडमध्ये अतिरिक्त स्पेक्ट्रम खरेदी करण्यासाठी रचलेल्या रणनीतीवरून असे दिसत आहे की, ग्राहक जोडण्याचा वेग यातून वाढला जाणार आहे.

तसेच जिओला जिओफोनच्या आक्रमक ऑफर आणि त्यानंतर स्मार्टफोनच्या लाँचिंगवरून कंपनीला सब्सक्राइब जोडण्यासाठी स्पीड वाढवण्यासाठी मदत होणार असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. जिओने मार्च 2020 मध्ये 47 लाख नवीन ग्राहक जोडले होते. यानंतर याची सरासरी 23 लाख दरमहा राहिली आहे. यात जिओ फोनच्या नवीन प्रस्ताव आणि स्मार्ट फोनमुळे दोन्ही नवीन ग्राहकांची संख्या वाढवण्यास मदत मिळू शकते. जिओच्या यशस्वी बाजार सेवा वाढवण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. यात असेही म्हटले की ग्राहक संख्येच्या विस्तारावर अधिक लक्ष दिले जाणार आहे.