फायद्याची गोष्ट ! ‘विनामूल्य’ कॉलिंगसह ‘डेटा’, संपुर्ण महिनाभर चालणारे ‘किफायत’शीर प्रीपेड प्लॅन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या मोबाइल रिचार्जचे प्लॅन आधीच्या तुलनेत खूप महागले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोबाइल रिचार्जसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. खरं तर ग्राहक नेहमी अशा प्लॅनच्या शोधात असतात, ज्यामध्ये त्यांना अधिक फायदा मिळत असतो. आपण आज अशा प्लॅनविषयी जाणून घेऊया ज्यात तुम्हाला २८ दिवसांसाठी विनामूल्य कॉलिंगसह डेटा व इतर फायदे मिळतात. एअरटेल आणि व्होडाफोन – आयडियाच्या या परवडणार्‍या प्रीपेड प्लॅनमध्ये आपल्याला अमर्यादित कॉलिंगचा फायदा मिळणार आहे. तसेच रिलायन्स जिओ प्लॅनमध्ये जिओ – टू – जिओ फ्री कॉलिंगचे फायदे उपलब्ध आहेत.

एअरटेलचा प्रीपेड प्लॅन; १४९ रुपयांपासून सुरू
एअरटेलची प्रीपेड योजना आता १४९ रुपयांपासून सुरु आहे ज्यात एअरटेल फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो आणि कोणत्याही नेटवर्कवर २८ दिवसांपर्यंत विनामूल्य कॉल करता येतो. तसेच २ जीबी डाटा देखील यात मिळत असून ३०० एसएमएस पाठविण्याची सुविधा देखील या प्लॅनमध्ये आहे. हा प्लॅन २८ दिवसांसाठी वैध असतो.

या १७९ च्या प्लॅनवर मिळणार २ लाखांचा विमा
एअरटेलच्या १७९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना तब्बल २ लाखांचा विमा मिळतो. तसेच या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य कॉलिंग आणि २ जीबी डेटा मिळतो. तसेच ३०० एसएमएस पाठविण्याची सुविधा देखील आहे. हा प्लॅन २८ दिवसांसाठी वैध असतो.

२१९ च्या प्लॅन मध्ये मिळणार दररोज १ जीबी डेटा
एअरटेलच्या २१९च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दर दिवसाला १ जीबी डेटा मिळतो. या योजनेची वैधता २८ दिवसांकरिता आहे. तसेच या प्लॅनमध्ये आपल्याला विनामूल्य कॉल करण्याचा लाभ मिळणार असून दररोज १०० एसएमएस पाठवता येणार आहेत. याबरोबरच एअरटेलच्या २४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळणार असून या प्लॅनची वैधता देखील २८ दिवसांसाठी आहे. म्हणजेच ग्राहकांना तब्बल ४२ जीबी डेटा मिळतो. विशेष म्हणजे एअरटेलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना ४ लाख रुपयांचा लाइफ इन्शुरन्स मिळतो. तसेच या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस पाठविण्याची देखील सुविधा आहे.

२९८ च्या प्लॅन मध्ये मिळणार दररोज २ जीबी डेटा
एअरटेलच्या २९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळतो. तसेच या प्लॅनची वैधता देखील सुमारे एक महिना म्हणजेच २८ दिवस इतकी आहे. म्हणजेच ग्राहकांना या प्लॅननुसार एकूण ५६ जीबी डेटा २८ दिवसांत मिळतो. याशिवाय एअरटेलचा ३४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन देखील ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा देतो. तसेच या प्लॅनची वैधताही २८ दिवसांची आहे. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये ग्राहकांना अ‍ॅमेझॉन प्राइमचे सदस्यत्व मिळते. तसेच दररोज १०० एसएमएस पाठविण्याची सुविधा देखील आहे.

एअरटेलचा दररोज ३ जीबी डेटाचा प्लॅन
जर आपल्याला अधिक डेटाची गरज भासत असेल तर आपण एअरटेलचा ३९८ रुपयांचा प्लॅन घेऊ शकतात. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज ३ जीबी डेटा मिळत असून वैधता २८ दिवसांची आहे. म्हणजेच ग्राहकांना महिन्याभरात एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. तसेच कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा लाभ देखील घेता येऊ शकतो. याशिवाय दररोज १०० एसएमएस पाठविण्याची सुविधा आहे.

व्होडाफोन; १४९ रुपयांचा प्लॅन
व्होडाफोनच्या १४९ रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना विनामूल्य कॉलिंगचा फायदा मिळणार असून या प्लॅनची वैधता सुमारे २८ दिवस इतकी असते. तसेच २ जीबी डेटा देखील मिळणार आहे. या प्लॅननुसार ३०० एसएमएस ची सुविधा मिळणार असून व्होडाफोन प्लेची सुविधा देखील देण्यात आली आहे.

व्होडाफोनचा दुसरा प्लॅन २१९ रुपयांचा असून यानुसार ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा मिळतो. तर या प्लॅनची वैधता २८ दिवस आहे. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य कॉल करण्याचा फायदा देखील या प्लॅनमध्ये आहे. या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस पाठविण्याच्या सोयीसह व्होडाफोन प्ले सदस्यता देखील उपलब्ध आहे.

व्होडाफोनच्या २४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा मिळणार असून या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. म्हणजेच ग्राहकांना २८ दिवसांत एकूण ४२ जीबी डेटा मिळत असतो. तसेच अमर्यादित कॉलिंगद्वारे दररोज १०० एसएमएस पाठविण्याची सोय आहे.

व्होडाफोनच्या २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा उपलब्ध असून याची वैधता २८ दिवसांची आहे. म्हणजेच ग्राहकांना एकूण ५६ जीबी डेटा यात मिळतो. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएस पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

दररोज ३ जीबी डेटा
व्होडाफोनच्या या ३९८ च्या प्लॅननुसार दररोज ३ जीबी डेटा मिळतो. तसेच या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. तसेच कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस आणि व्होडाफोन प्ले सदस्यता देखील मिळते.

जिओचा प्लॅन १२९ रुपयांपासून सुरू
रिलायन्स जिओचा १२९ रुपयांच्या प्लॅननुसार २ जीबी डेटा मिळतो. तसेच या प्लॅनची वैधता २८ दिवसांची असून या प्लॅनमध्ये जिओ-टू-जिओ कॉलिंग विनामूल्य आहे. तसेच दुसर्‍या नेटवर्कच्या नंबरवर कॉल करण्यासाठी १००० नॉन-लाइव्ह मिनिटे देखील उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये ३०० एसएमएस पाठविण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. तसेच जिओ अ‍ॅप्सची सदस्यता देखील मिळणार आहे.

रिलायन्स जिओच्या १९९ रुपयांच्या प्लॅननुसार २८ दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण ४२ जीबी डेटा मिळतो. जिओ – टू – जिओ कॉलिंग प्लॅन विनामूल्य आहे. अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी १००० नॉन – लाइव्ह मिनिटे उपलब्ध असून या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस पाठविण्याची सुविधा आहे.

जिओचा दर दिवसाला २ जीबी डेटा देण्याचा प्लॅन
रिलायन्स जिओचा २४९ रुपयांच्या प्लॅननुसार ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळतो. तसेच या प्लॅनची वैधता २८ दिवसांसाठी असते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like