Jitendra Awhad | बेरोजगारीच्या मुद्यावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक, ”बेरोजगार तरूणांनी उद्या कायदा हातात घेतला तर…”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बेरोजगारीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आक्रमक झाले आहेत. सरकारने (State Government) बेरोजगारीच्या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहिले नाही तर बेरोजगार तरूणांनी उद्या कायदा हातात घेतला तर त्याचे फार वाईट परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला भोगावे लागतील, असा गंभीर इशारा आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सरकारला दिला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, राज्याच्या रोजगार आणि उद्योजकता विभागाकडील नोंदीनुसार राज्यात ६२ लाखांहून अधिक अधिकृत बेरोजगार आहेत. विशेष म्हणजे बेरोजगारीचे हे प्रमाण शासन दरबारी नोंद केलेल्यांचे आहे. याचा अर्थ नोंदणी नसलेल्या बेरोजगारांची संख्या दुप्पट असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात तब्बल ४ लाख बेरोजगारांची नोंद आहे.

शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Education Minister Deepak Kesarkar) यांच्यावर टीकास्त्र सोडताना आव्हाड यांनी म्हटले आहे की, अलीकडेच एका पात्र शिक्षक उमेदवार तरूणीने शिक्षणमंत्र्यांना शिक्षक भरतीविषयी सार्वजनिकपणे प्रश्न विचारल्यानंतर राज्याचे शिक्षण मंत्री प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर म्हणाले की, तुझं नाव शोधून काढून तुला अपात्र ठरवू. म्हणजे बेरोजगार तरूण-तरूणींना जाहीरपणे धमकी देण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. महाराष्ट्राची संस्कृती अशी कधीच नव्हती, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

बेरोजगारीचं भीषण वास्तव मांडताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नमूद केले आहे की, अवकाळी पावसाने
ग्रामीण भागातील शेतकरी देशोधडीला लागलाय. मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी शिकणाऱ्या त्यांच्या मुलांकडे खानावळीचं
बिल भरण्यासाठीचे पैसे नाहीत. पण सरकार सुशेगात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजकीय टीका तावातावाने
करतात. पण बेरोजगारीच्या मुद्यावर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही.

आव्हाड यांनी पुढे म्हटले आहे की, दुष्काळ, बेरोजगारी, महागाई या समस्या फक्त वर्तमानपत्रांच्या हेडलाईन होतायत.
सरकारने याकडे गांभीर्याने पाहिलं नाही तर बेरोजगार तरूणांनी उद्या कायदा हातात घेतला तर त्याचे फार वाईट
परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला भोगावे लागतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MLA Rajesh Tope | राजेश टोपे यांच्या कारवर हल्ला, एका राजकीय नेत्यावर आरोप करत नोंदवला निषेध