NCP MLA Rajesh Tope | राजेश टोपे यांच्या कारवर हल्ला, एका राजकीय नेत्यावर आरोप करत नोंदवला निषेध

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे (NCP MLA Rajesh Tope) यांची कार जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Jalna District Central Bank) आवारात उभी असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी कारवर दगडफेक (Throwing Stones at Cars) केली आहे. हल्लेखोरांनी कारवर ऑईल देखील टाकल्याने कार जाळण्याचा त्यांचा प्रयत्न असावा, असे म्हटले जात आहे. (NCP MLA Rajesh Tope)

दरम्यान, हल्लेखोरांनी केलेल्या या हल्ल्यात राजेश टोपे यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.
जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुक असल्याने राजेश टोपे (NCP MLA Rajesh Tope) जिल्हा मध्यवर्ती बँकेत
आले होते. कार बँकेच्या आवारात उभी असताना अज्ञात हल्लेखोरांनी कारच्या समोरील काचेवर दगडफेक करून कारवर ऑइलही टाकले.

या खळबळजनक प्रकाराबाबत प्रतिक्रिया देताना राजेश टोपे म्हणाले की, माजी मंत्री बबनराव लोणीकर
(Babanrao Lonikar) यांच्या समर्थकांनी जिल्हा बँकेच्या आवारात आणि माझ्या कारवर दगडफेक केली.
यात कारची समोरील काच फुटली आहे. ही गोष्ट अत्यंत निषेधार्य आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Amol Kolhe | ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली : प्रत्येक चौकात २५ हजाराची वसुली करा, अमोल कोल्हेंना महिला वाहतूक पोलिसाने दाखवला मेसेज (Video)

Animal Deleted Scenes | रणबीर कपूर आणि तृप्ति डिमरीचा Animal मधील हॉट व्हिडिओ झाला व्हायरल, रोमॅन्टिंक व्हिडिओने इंटरनेटवर घातला गोंधळ…

Mouni Roy In Transparent Top | मौनी रॉयने पारदर्शक ड्रेस घालून दिल्या किलर पोज, व्हायरल फोटोने इंटरनेटचा वाढवला पारा…