Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीची महिला आयोगात धाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात (Mumbra Police Station) विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांनी आपण राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या वचावासाठी त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड (Hruta Awhad) यांनी राज्य महिला आयोगात धाव घेतली आहे. ऋता आव्हाड यांनी राज्य महिला आयोगाच्या (State Commission for Women) अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना अर्ज दिला आहे. त्यात त्या म्हणतात, जितेंद्र आव्हाड यांच्यावर राजकीय हेतून विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा आणि फिर्यादी महिला रीदा रशीद (Rida Rashid) यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी कारवाई करावी. त्यांच्या या अर्जाचा स्वीकार करण्यात आला आहे. त्यांच्या अर्जावर राज्य महिला आयोगाकडून पत्रक जारी करण्यात आले आहे.

 

ऋता जितेंद्र आव्हाड यांचा तक्रार अर्ज आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कलम ३५४ अंतर्गत खोटा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दबावतंत्र वापरुन दाखल केला असल्याने सदर गुन्हा रद्द करुन, फिर्यादी महिलेवर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ऋता आव्हाड यांनी केली आहे. त्यानुसार सदर प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचेकडून मूळ फिर्यादी महिलेने दाखल केलेला गुन्हा आणि परस्परविरुद्घ प्राप्त झालेले तक्रार अर्ज या दोन्हीबाबत सत्यता पडताळून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविण्यात आला आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. असे पत्रक आयोगाकडून जारी करण्यात आले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. राज्यात हुकुमशाही पद्धतीने सरकार चालले आहे.
त्यांनी माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने आरोप आणि गुन्हा दाखल केला आहे, असे आव्हाड म्हणाले.
ज्या दिवशी हा प्रकार घडला. त्यादिवशी रात्री मुख्यमंत्री कोणाच्यातरी घरी जेवायला गेले होते.
त्याठिकाणी या बाई देखील उपस्थित होत्या. आणि त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) माझे जुने मित्र आहेत.
आम्ही एकमेकाला बऱ्याच वेळा मदत केली आहे. तरी देखील त्यांनी राजकीय सुडापोटी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे,
असे आव्हाड म्हणाले.

 

Web Title :- Jitendra Awhad | rita awhads run to the womens commission the president rupali chakankar gave instructions to the police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Delhi Crime | ‘डेक्सटर’ वेब सिरीज पाहून प्रियसीचे केले 35 तुकडे; वसईच्या श्रद्धा वालकरचे खून प्रकरण

Bhumi Pednekar | “वाह, काय ती सुंदरता..”, भूमी पेडणेकरचे लेटेस्ट फोटो पाहुन होताल घायाळ, पहा फोटो एका क्लिकवर

Dhananjay Munde | ‘भाऊ असे पर्यंत बहिणीचा चेक बाऊन्स होणार नाही…’; धनंजय मुंडेंचे पंकजाताईंना आश्वासन