Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या जामिनाचा निकाल राखीव; काय होणार याकडे सर्वांची उत्सुकता

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – ठाण्यातील एका पूल उद्घाटनाची कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एका महिलेला हात धरून बाजूला केले होते. आता, या प्रकरणी त्या महिलेने आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याविरोधात जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) ठाणे कोर्टात (Thane Court) धाव घेतली. आव्हाडांनी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर आज सुनावणी झाली.

 

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले होते. पण, आज ठाणे कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने आव्हाड यांच्यावरील जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला असून दुपारी 2 वाजता निकाल जाहीर केला जाईल.

 

मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये (Mumbra Police Station) एसीपी सोनाली ढोले (ACP Sonali Dhole) यांनी विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
‘प्रकरण संवेदनशील आहे. हाताने बाजूला केले आहे.
आरोपी राजकीय बलाढ्य व्यक्ती आहे त्यामुळे अटक पूर्व जामीन दिल्यास गुन्ह्यावर परिणाम होईल.
त्यांना अटक पूर्व जामीन देऊ नये.’ अशी मागणी ढोले यांनी केली.
तर गजानन चव्हाण (Gajanan Chavan) यांनी आव्हाडांच्या वतीने युक्तिवाद केला.
न्यायाधिशांना घडलेल्या प्रकाराची क्लिप दाखवली गेली, असून आता न्यायालय (Thane Court) काय निर्णय देते यावर लक्ष लागले आहे.

 

Web Title :- Jitendra Awhad | the court will give its verdict on jeetendra awhads pre arrest bail at 2 pm

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Delhi Crime | ‘डेक्सटर’ वेब सिरीज पाहून प्रियसीचे केले 35 तुकडे; वसईच्या श्रद्धा वालकरचे खून प्रकरण

Bhumi Pednekar | “वाह, काय ती सुंदरता..”, भूमी पेडणेकरचे लेटेस्ट फोटो पाहुन होताल घायाळ, पहा फोटो एका क्लिकवर

Dhananjay Munde | ‘भाऊ असे पर्यंत बहिणीचा चेक बाऊन्स होणार नाही…’; धनंजय मुंडेंचे पंकजाताईंना आश्वासन