जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या ‘वादग्रस्त विधानाने वारकरी संतप्त 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आज पुन्हा एका नव्या वादात सापडले आहेत. मला सर्व गीता तोंडपाठ आहे असे सांगत गीतेतील एक श्लोकही पूर्ण न म्हणालेले आमदार आव्हाड यांनी फेसबुक लाईव्हवर संत तुकाराम महाराजांचा खून झाला होता असे वादग्रस्त विधान केले, या विधानाने वारकरी संतप्त झाल्याचे दिसून येत आहे.
[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b128cd8d-868a-11e8-a5c2-4b6d0abb87f3′]

याबाबत मिळालेली माहिती अशी की, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल फेसबुक लाईव्हवर संत तुकाराम महाराजांचा खून झाला होता असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर आव्हाडांकडून वादग्रस्त विधान असलेला व्हिडीओ डिलीट करण्यात आला. आव्हाडांच्या विधानाने भावना दुखावल्याची प्रतिक्रिया वारकरी संप्रदायाने नोंदवली. तुकाराम महाराजांबद्दल असे बोलण्याचे धाडस आव्हाडांनी केलेच कसे ?, त्यांच्या या विधानाबद्दल त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, अशा प्रतिक्रियाही  वारकरी संप्रदायाने  नोंदवल्या आहेत.
[amazon_link asins=’B0746HF973′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b68e2d94-868a-11e8-976e-71e4ba4db4eb’]

काल जितेंद्र आव्हाड यांनी  पत्रकारांशी संवाद साधताना मला गीता तोंडपाठ असल्याचे म्हंटले होते. यावेळी एका पत्रकाराने त्यांना गीतेतील एक श्लोक म्हणण्यास सांगितले,  मात्र जितेंद्र आव्हाड यांना श्लोक पूर्ण करता आला नाही. याशिवाय त्यांचे अनेक उच्चारदेखील चुकले. यानंतर आव्हाड श्लोक म्हणण्यास सांगणाऱ्या पत्रकारावरच भडकले. तुम्ही नंतर बाजूला या. मी तुम्हाला श्लोक म्हणून दाखवतो, असे आव्हाड म्हणाले.