ज्योतिरादित्य शिंदेंनंतर भाजपकडून काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता लागला गळाला, थोड्याच वेळात भाजपमध्ये प्रवेश करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचा (Uttar Pradesh Eletion) तयारीने वेग घेतला आहे. काँग्रेस (Congress) सुस्त पडलेली असताना भाजपने मुख्यमंत्र्यांपासून आमदारांच्या कामाचा आढावा आणि मतदारसंघातील वातावरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
याचसोबत भाजपने (bjp) काँग्रेसला मोठा धक्का देण्याची तयारी केली.
उत्तर प्रदेशातील काँग्रेसचा मोठा चेहरा असलेले जितिन प्रसाद (Jitin Prasad) पुढील काही तासात भाजपमध्ये (bjp) प्रवेश करणार आहेत.

Pune Crime News : पुण्यात रक्तचंदनाची तस्करी करणार्‍या तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं पकडलं; 27 लाखाचा माल जप्त

 

जितिन प्रसाद पीयूष गोयल यांच्या भेटीला
दरम्यान, काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद हे केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहेत.
आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे खुद्द भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार आहेत.
दिल्ली येथील भाजप मुख्यालयात (BJP headquarters) हा कार्यक्रम होणार असल्याचे समजतेय.
सध्या भाजप मुख्यालयात जोरदार तयारी सुरु झाली आहे.

Shivsena | शिवसेनेकडून पुन्हा एकदा स्पष्टोक्ती ! म्हणाले – ‘सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो’

राजकीय दृष्ट्या उत्तर प्रदेश महत्वाचे राज्य
पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे.
राजकीय दृष्ट्या उत्तर प्रदेश हे देशातील एक अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे.
भाजप येथील निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.
अशातच काँग्रेसच्या या मोठ्या नेत्याचा भाजप प्रवेश म्हणजे, काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

 

Also Read This : 

 

खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी