East Central Railway Recruitment 2021 : ईस्ट सेंट्रल रेल्वेत सीए, जनरल असिस्टंटच्या पदासाठी भरती, असे होईल सिलेक्शन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ईस्ट सेंट्रल रेल्वे, हाजीपुर, बिहारने विविध पदांसाठी व्हॅकन्सी काढली आहे. या अंतर्गत रेल्वेत सीए, जनरल असिस्टंट, सिग्नल अँड टेलीकम्युनिकेशन इन्स्ट्रक्टरच्या पदांवर नियुक्ती केली जाईल. ज्या उमेदवारांना या पोस्टसाठी अर्ज करायचा आहे, ते ऑफिशियल पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या तारखा लक्षात ठेवा
* ईस्ट सेंट्रल रेल्वेचे नोटिफिकेशन जारी झाल्याची तारीख – 18 फेब्रुवारी 2021
* सीए आणि जनरल असिस्टंट पदासाठी ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2021
* सिग्नल अँड टेलीकम्युनिकेशन इन्स्ट्रक्टर पदासाठी ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख – 10 मार्च 2021

एकुण पदसंख्या / वय / शैक्षणिक पात्रता
सीएच्या 2, जनरल असिस्टंटच्या 1, सिग्नल अँड कम्युनिकेशनच्या 1 पदावर नियुक्ती केली जाईल. तर सीए आणि जनरल असिस्टंटच्या पदावर कमाल वय 65 असावे. तर सिग्नल अँड टेलीकम्युनिकेशन इन्स्ट्रक्टरच्या पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराचे वय 52 वर्षापेक्षा जास्त असू नये. या पदांशी संबंधीत शैक्षणिक पात्रतेची व अन्य माहिती अधिकृत वेबसाइटवर जाऊन पाहू शकता.

अशी होईल निवड
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होईल.

वेतन
* सीए- 35400-112400
* जनरल असिस्टंट- 18000-56900
* सिग्नल अँड टेलीकम्युनिकेशन इन्स्ट्रक्टर- लेव्हल 7