Sarkari Naukri : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काढल्या टेक्निकल ऑफिसर पदांसाठी भरती, असा करा अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (ईसीआयएल) देशातील विविध प्रोजेक्ट साईट्सवर विभागांमध्ये तांत्रिक अधिकाऱ्यांच्या पदांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भारत सरकारच्या अणु उर्जा विभागांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ईसीआयएलने ज्या विभागांसाठी रिक्त जागा घोषित केल्या आहेत, त्यामध्ये कंट्रोल व इंस्ट्रुमेन्टेशन, कंट्रोल सिस्टम ग्रुप, दूरसंचार विभाग, स्मार्ट गव्हर्नन्स सोल्यूशन विभाग, सुरक्षा व्यवस्था आणि प्रकल्प विभाग यांचा समावेश आहे. या सर्व विभागांसाठी दुर्गापूर, कोचीन, मुंद्रा, हैदराबाद, मुंबई, चंदीगड आणि चेन्नईच्या जागांसाठी भरती होणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ecil.co.in वर दिलेला ऑनलाईन अर्ज फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात. उमेदवारांनी लक्षात घ्यावे की, ईसीआयएलकडून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२० (दुपारी ४ वाजेपर्यंत) निश्चित केली गेली आहे.

कोण करू शकतात अर्ज ?
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेशी संबंधित अभ्यासात प्रथम श्रेणीत बीई किंवा बीटेक पदवी प्राप्त केलेले उमेदवार ईसीआयएल तांत्रिक अधिकारी पदासाठी अर्ज करू शकतात. तसेच ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ३० वर्षे असणे आवश्यक आहे.

अशी होईल निवड
ईसीआयएल तांत्रिक अधिकारी पदासाठी पात्र उमेदवारांची मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. ही मुलाखत व्हर्च्युअल पद्धतीने घेतली जाईल आणि त्यासाठी उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग त्यांच्या पात्रता परीक्षेतील (बीई/ बीटेक) गुण आणि आवश्यक असलेल्या एका वर्षाच्या अनुभवाच्या आधारे केली जाईल.

वेतनमान
ईसीआयएलमधील तांत्रिक अधिकाऱ्यांच्या पदावर कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे, ज्याचा कालावधी सुरूवातीला एक वर्ष असेल. तांत्रिक अधिकारी पदासाठी दरमहा २३ हजार रुपये पगार दिला जाईल.