‘ऑस्कर’ची ट्रॉफी खुर्चीखाली लपवत होता ‘तो’ डायरेक्टर (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऑस्कर 2020 समाप्त झाला आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही काही सिनेमांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. अनेक सिनेमांनी ऑस्कर अवॉर्डमध्ये शानदार सादरीकरण केलं आहे. साऊथ कोरियाचा सिनेमा पॅरासाईट विशेष चर्चेत राहिला. इंटरनॅशनल फिचर फिल्म आणि बेस्ट फिल्मचा ऑस्कर जिंकल्यानंतर या सिनेमानं इतिहास रचला. याशिवाय जोजो रॅबिट सिनमाचे डायरेक्टर आपल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत.

जोजो रॅबिटचे डायरेक्टर तायका वेतीती(Taika Waititi) यांनी बेस्ट अडॉप्टेड स्क्रीनप्लेचा ऑस्कर जिंकला आणि ते आपल्या चेअरवर येऊन बसले. थोड्याच वेळानंतर ते आपली ऑस्करची ट्रॉफी खुर्चीच्या खाली लपवताना दिसले. ब्राय लारसननं हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, तायका आपला ऑस्कर अवॉर्ड खुर्चीच्या खाली लपवण्याचा प्रयत्न करत आहे.

https://twitter.com/blarsononline/status/1226698007577583616

तायका यांचा हा व्हिडीओ सोशलवर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे. नेटकऱ्यांच्या मजेदार कमेंट्स या व्हिडीओवर येताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलं की, अशी आशा करतो की, ते ऑस्कर अवॉर्ड खुर्चीच्या खालीच विसरून जाऊ नये. एकानं असं म्हटलं की, आता एवढी भारी भक्कम ट्रॉफी द्याल तर कोणीही व्यक्ती काय करेल.