Jubin Nautiyal | प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल रुग्णालयात दाखल; डोक्याला झाली गंभीर दुखापत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Jubin Nautiyal | बॉलिवूडमध्ये आज अनेक गायक दिसतात, यामध्येच एक बहुचर्चित नाव म्हणजे जुबिन नौटियाल. जुबिनने बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांनी आवाजाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र, आता जुबिनच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. सध्या जुबिनला दुखापत झाली असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी तो घराच्या पायऱ्यांवरून खाली पडला. तोल गेल्यामुळे तो खाली कोसळला आणि त्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही बातमी कळताच त्याचे चाहते तो बरा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. (Jubin Nautiyal)

 

नुकतेच जुबिनचे ‘तू सामने आये’ हे गाणं रिलीज झालं होतं. या गाण्यात त्यांनी गायक योहानी सोबत आवाज दिला होता, तर हे गाणे त्यांनी योहानी सोबत गुरुवारी लॉन्च केले होते. हे गाणे सगळ्यांनाच खूप आवडले होते. जुबिनचे प्रत्येक गाणे प्रेक्षकांना आपलेसे वाटते. या घटनेमध्ये जुबिनला गंभीर दुखापत झाली असून, यामध्ये त्याचा कोपर तुटला असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर त्याच्या बरगड्या आणि कपाळावरही जखम झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Jubin Nautiyal)

जुबिनने आजपर्यंत राता लंबियां, लूट गए, हमवा मेरे आणि तुझे कितने चाहने लगे हम, तुम ही आना,
बेवफा तेरा मासूम चेहरा अशी अनेक सुपरहिट गाणी प्रेक्षकांना दिली आहेत,
तर एवढेच नाही लोकांना त्याचे व्हिडिओदेखील पाहायला खूप आवडतात. अलीकडेच जुबिननी ‘गोविंदा नाम मेरा’
या चित्रपटातील बना शराबी शमिल आणि थँक गॉड या चित्रपटांतील माणिके हे गाणेही गायले आहे.
सध्या त्याचे चाहते आणि मित्रपरिवार त्याला लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

 

Web Title :- Jubin Nautiyal | famous singer jubin nautiyal fell down the stairs hospitalized due to serious injuries

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Thane Measles Update | मुंबईपाठोपाठ ठाणेसुद्धा ‘गोवर’च्या विळखेत; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू

Pravin Darekar | 123 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबै बँकेचे अध्यक्ष भाजप आमदार प्रवीण दरेकरांना आरोपपत्रातून वगळले

Sanjay Raut | ‘शिवसेना सोडली आणि हेमंत गोडसे यांची कारकीर्द संपली, त्यांनी स्वत:च स्वत:ची कबर खोदली’ – संजय राऊत