Jui Gadkari | जुई गडकरीने ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या दिगदर्शकाला दिली ‘हि’ खास गोष्ट; पोस्ट वायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकत आहे. स्टार प्रवाह वरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पुन्हा एकदा जुईला छोटा पडद्यावर पाहून चाहते देखील आनंदी झाले आहेत. तिच्या या नवीन पात्राला चाहते भरभरून प्रेम देताना दिसत आहेत. तर नुकताच जुईने (Jui Gadkari) शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. या मालिकेचा दिग्दर्शक सचिन गोखले यांच्यासाठी तिने खास गोष्ट केल्याचे नमूद केले आहे.

 

मालिकेमध्ये कलाकार हे नेहमीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतात. मात्र पडद्यामागे काम करणाऱ्या व्यक्ती क्वचितच प्रेक्षकांसमोर दिसत असतात. पडद्यामागे राहून सारे सूत्र हलवणारे महत्त्वाचे अशी व्यक्ती असल्यामुळेच मालिका पुढे चालत असते. ठरलं तर मग या मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांच्यासाठी जुईने सेटवर एक खास गोष्ट केली आहे. तिने त्यांच्यासाठी एक खाऊचा डबा बनवला आणि त्याला ‘डिरेक्टर बॉक्स’ असे हटके नाव दिले आहे. तर सेटवर जुई दररोज विविध पदार्थ खाण्यासाठी घेऊन येत असते आणि सचिन गोखले यांच्यासाठी आणलेल्या या खाऊच्या डब्यात ती खाऊ संपणार नाही याकडे आवर्जून लक्ष देत असते.

 

जुईच्या (Jui Gadkari) या उपक्रमाचे सचिन गोखले यांनीही तोंड भरून कौतुक केले आहे.
तर जुईच्या चाहत्यांना देखील तिचीही आयडिया फारच आवडल्याचे त्यांनी कमेंट करून सांगितले आहे.
जुईला अनेक दिवसानंतर छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहिल्यावर चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत
आणि तिच्या विविध पोस्टवर खूप सारे प्रेम देखील देत आहेत.

 

Web Title :- Jui Gadkari | jui gadkari gives a unique gift to the tharl tr mg serial director sachin gokhale

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sharad Pawar | शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याचा शोध लागला; अजित पवारांची माहिती

IND vs BAN Test | भारताचे ‘हे’ 3 खेळाडू रचू शकतात इतिहास; व्हाईस कॅप्टन चेतेश्वर पुजाराही समावेश

Urfi Javed | उर्फी जावेद पुन्हा एकदा अडकली कायद्याच्या कचाट्यात; ‘या’ व्यक्तीने दाखल केली तक्रार