Kalpana Giri Murder Case | काँग्रेसच्या महिला पदाधिकारी कल्पना गिरी हत्याकांडातील दोघांना जन्मठेप, चौघांना ३ वर्षांची सक्त मजुरी; साडेनऊ वर्ष चालला खटला

लातूर : Kalpana Giri Murder Case | लातूरमधील काँग्रेसच्या महिला पदाधिकारी कल्पना गिरी हत्याकांड (Kalpana Giri Murder Case) प्रकरणी न्यायालयाने दोन मुख्य आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर चार जणांना तीन वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. तुळजापुरजवळच्या तलावात तिचा मृतदेह सापडला होता. हा खटला तब्बल साडेनऊ वर्ष चालला. यामध्ये १२६ साक्षीदार तपासले गेले. एक हजार पानांपेक्षा जास्त दोषारोपपत्र दाखल केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात ‘तंदूर से लातूर’ असा या हत्याकांडाचा उल्लेख केल्याने हे प्रकरण देशभर गाजले होते. २१ मार्च २०१४ रोजी महिला काँग्रेस पदाधिकारी कल्पना गिरीचा खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी ६ लोकांना अटक केली होती. नऊ वर्षांपासून एक आरोपी जेलमध्ये होता, तर इतर ६ जण जामिनावर बाहेर होते. (Kalpana Giri Murder Case)

स्थानिक पोलीस ते सीबीआय अशा पाच तपास यंत्रणांनी या प्रकरणी तपास पूर्ण केला होता. याप्रकरणी जवळपास हजार पानांचे दोषारोप पत्र पोलिसांनी दाखल केले होते. (Latur Crime News)

कल्पना गिरीचा मृतदेह तुळजापूर जवळच्या तलावात सापडला होता. अपहरण आणि बलात्कारानंतर खून केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला होता. तसेच हा खून युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे, असा आरोप सुद्धा मृताच्या वडिलांनी केला होता. या हत्याकांडानंतर आरोपी सापडत नसल्याने लातूरमध्ये वातावरण तापले होते.

नंतर पोलिसांनी महेंद्रसिंह चौहान आणि समीर किल्लारीकर या दोघांना अटक केली. महेंद्रसिंह चौहान हा युवक कॉंग्रेसचा शहर अध्यक्ष होता, तर समीर किल्लारीकर सदस्य होता. समीर किल्लारीकर याने कबुल केले की, महेंद्रसिंह चौहान आणि मृत कल्पना गिरी यांच्यात घटनेच्या दिवशी भांडण झाले होते.

महेंद्रसिंह चौहान याचे फटकून वागणे कल्पना गिरीला आवडत नव्हते. तुळजापूर जवळील तलावात ढकलून आरोपीने तिचा
खून केला होता. कल्पना गिरी हिने युवक कॉंग्रेसची निवडणूक लढवू नये, असे आरोपींचे म्हणणे होते.
मात्र तिने या निवडणुकीत सहभाग घेतल्याने तिला युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी सतत अपमान करत होते.

कल्पना गिरी २१ मार्च २०१४ रोजी बेपत्ता झाली. २४ मार्चला तिचा मृतदेह धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरजवळ
पाचुंदा तलावात सापडला. २४ तारखेला रात्री उशिरा मृतदेह लातुरामध्ये आणल्यावर तातडीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
२६ मार्च रोजी बलात्कार करून खून करण्यात आल्याची तक्रार कल्पना गिरीच्या भावाने पोलिसांत दाखल केली.

२८ तारखेला संध्याकाळी पोलिसांनी हत्येप्रकरणी युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष महेंद्रसिंह चौहान आणि समीर किल्लारीकर
या दोघांना अटक केली होती. १३ एप्रिल रोजी या प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी श्रीरंग ठाकूर याला पोलिसांनी
अटक केली होती. १५ एप्रिल रोजी चौथा संशयित आरोपी म्हणून प्रभाकर शेट्टी या हॉटेल व्यावसायिकाला पोलिसांनी
अटक केली होती. त्यानंतर आणखी काही जणांना पोलिसांनी अटक केली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad | आता शिवसेना-राष्ट्रवादीच्या याचिकांवर एकत्र सुनावणी; जितेंद्र आव्हाड म्हणाले…