Kalyani Nagar Car Accident Pune | कल्याणीनगर अपघात प्रकरण: 15 तासात जामीन मंजूर ! बाल न्याय मंडळाच्या सदस्यांना कारणे दाखवा नोटीस

पुणे : Kalyani Nagar Car Accident Pune | कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार (Pune Porsche Car Accident) चालवत दोघांना धडक दिली होती. दरम्यान या अपघातात दोन तरुण अभियंत्यांचा (IT engineer) मृत्यू झाला होता. या अपघातातील अल्पवयीन आरोपी मुलाला बाल न्याय मंडळात हजर करण्यात आले.

त्यावेळी अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहिणे, वाहतूक पोलिसांबरोबर (Pune Traffic Police) पंधरा दिवस वाहतुकीचे नियोजन करणे आणि मद्याचे व्यसन सोडविण्यासाठी उपचार घ्यावेत, अशा अटी, शर्तीवर मुलाला १५ तासात जामीन मंजूर करण्यात आला होता.

बाल न्याय मंडळाच्या Juvenile Justice Board (JJB) निर्णयावर विविध संघटनांनी टीका केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलीस आयुक्तालयात (Pune CP Office) पत्रकार परिषद घेऊन मंडळाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.

अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना बाल न्याय मंडळातील सदस्यांनी निकषांचे पालन केले की नाही,
याची पडताळणी करण्यासाठी महिला आणि बाल विकास विभागाने २२ मे रोजी पाच सदस्यांची समिती नेमली होती.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यातील तरतूदींनुसार या समितीची स्थापन करण्यात आली होती. (Kalyani Nagar Car Accident Pune)

समितीकडून १०० पानी अहवाल सादर करण्यात आला आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुलाला जामीन मंजूर करताना बाल न्याय मंडळाच्या सदस्यांकडून
पुष्कळ चुका झाल्या असे निरीक्षण चौकशी समितीने नोंदविले आहे.

त्यानुसार सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून,
चार ते पाच दिवसांत झालेल्या चुकांबाबत स्पष्टीकरण देण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Swatantra Veer Savarkar Foundation | स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन च्या वतीने ’10 वी नंतर करिअर गाईडन्स’ संपन्न

Katraj Chowk Accident News | कात्रज चौकात एसटीच्या चाकाखाली येऊन तरुणीचा मृत्यू

Ayushman Bharat Yojana | आयुष्मान कार्डवर हॉस्पिटलने मोफत उपचार करण्यास दिला नकार, तर फिरवा ‘हा’ नंबर, समस्‍या ताबडतोब लागेल मार्गी

Ravindra Waikar | रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाने वापरला EVM अनलॉक करणारा फोन ; तपासातून खळबळजनक माहिती समोर