#MeToo वर अभिनेते कमल हसन यांचे वक्तव्य 

चेन्‍नई :  वृत्तसंस्‍था

#MeToo च्या मोहिमेने देशभरात धुमाकूळ घातला आहे. यात फक्त सिनेसृष्टीच नव्हे तर, राजकीय, शैक्षणिक, कोर्पोरेट सेक्टर यांमधून #MeToo च्या घटना समोर येत आहेत. यात अयाने नेक जण आपले मत मांडत आहेत. तर यात आता अभिनेता कमल हसन याने आपले मत व्यक्त केले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9d0d8312-ceb9-11e8-8f21-d95ca9439a09′]

 ‘गेल्‍या काही दिवस मी टू मोहीम तीव्र बनली आहे. महिलांना कामाच्‍या ठिकाणी लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागले आहे. या प्रकाराला आरोपी जबाबदार आहेत. ज्‍या लोकांवर महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे, त्‍या व्‍यक्‍तींनी समोर येऊन उत्तर द्‍यायला हवे, असे अभिनेता  कमल हासन यांनी म्हंटले आहे.

इतकेच नव्हे तर  या मोहिमेला सगळीकडून जोरदार  पाठिंबाही  मिळत आहे.

#MeToo : तुमचे सत्य लवकरच समोर येईल : हेअर स्टाईलिस्टचा बिग बींना इशारा

#MeToo  या सोशल मीडियाच्या मोहिमेद्वारे राजकीय ,सिनेक्षेत्र ,कॉर्पोरेट ,एवढेच काय शैक्षणिक क्षेत्रातूनही मोठ्या संख्येने महिलांसोबत गैरवर्तन केल्याच्या तक्रारी येत आहेत . #MeToo  मोहिमेमुळे तर संपूर्ण बॉलिवूड ढवळून निघत आहे . यातच # ‘मी टू’  मोहिमेबद्दल आणखी महत्वाची बातमी म्हणजे #MeToo चळवळीतून पुढे आलेल्या घटनांच्या तपासणीसाठी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीत कायदेतज्ज्ञांचा समावेश असेल. #MeToo च्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक महिलेवर माझा विश्वास आहे, असे महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी म्हणाल्या. या सर्व महिलांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी लवकरच एक समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर #MeToo चळवळीने  जोर धरला आहे. या माध्यमातून अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांना वाचा फोडली आहे. यामध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आणि पत्रकारांचा समावेश आहे. या तक्रारींची प्रथमच सरकारनं दखल घेतली आहे. या सर्व प्रकरणांच्या चौकशीसाठी सरकार चार सदस्यांची नेमणूक करणार आहे. यामध्ये चार निवृत्त न्यायमूर्तींचा समावेश असेल. या समितीकडून मी टू चळवळीच्या माध्यमातून पुढे आलेल्या तक्रारींवर सुनावणी होईल.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01M0JSAFU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1df00c5b-ceba-11e8-ac3e-a5edae05e221′]

मी टूच्या माध्यमातून पुढे आलेल्या प्रत्येक महिलेचे  दु:ख आणि त्यांची व्यथा मी समजू शकते, असे महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी म्हणाल्या. ‘या तक्रारींच्या चौकशीसाठी चार निवृत्त न्यायाधीशांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच ही समिती स्थापन होईल आणि या सर्व तक्रारींवर सुनावणी होईल’, अशी माहिती त्यांनी दिली. अभिनेत्री तनुश्री दत्तानं अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात गैरवर्तनाची तक्रार केल्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेले अनुभव मोकळेपणानं सोशल मीडियावर मांडले. यासोबतच अनेक महिला पत्रकारांनीदेखील त्यांना आलेले कटू अनुभव या माध्यमातून जगासमोर आणले आहेत.

[amazon_link asins=’B00KGZZ824,B074ZF7PVZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3352994f-ceba-11e8-a23c-f1977e113710′]