354 कोटी रूपयांच्या बँक घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री कमलनाथांचा भाचा रतुल पुरी अटकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मंगळवारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे आणि मोजर बेयरचे माजी कार्यकारी संचालक रतुल पुरी यांना अटक केली आहे. सेंट्रल  बैंक ऑफ इंडियाने 354 कोटी रुपयांच्या फसवणूकीप्रकरणी रतुल पुरी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. बँकेने केलेल्या तक्रारीनुसार कंपनी 2009 पासून विविध बँकांकडून कर्ज घेत होती आणि अनेकदा कर्जफेडीच्या अटींमध्ये बदल करून घेत होती. एजन्सीच्या एका अधिकाऱ्याने याविषयी माहिती दिली आहे.

ईडीने ही कारवाई सीबीआईद्वारा पुरी, त्यांची  कंपनी, त्यांचे वडील आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक पुरी, संचालक नीता पुरी, संजय जैन आणि विनीत शर्मा यांच्याविरुद्ध केली आहे. त्यांच्यावर गुन्हेगारी कट, फसवणूक,  आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली खटला दाखल झाल्यानंतर तीन दिवसांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2012 मध्ये कार्यकारी संचालक पदाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यांचे आई-वडील कार्यकारी मंडळावर कायम राहिले. कंपनी  कॉम्पॅक्ट डिस्क, डीव्हीडी, सॉलिड स्टेट स्टोरेज डिव्हाइसेस यासारख्या ऑप्टिकल स्टोरेज मीडियाच्या निर्मितीमध्ये  ही कंपनी गुंतलेली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय तपास यंत्रणेने या संदर्भात पुरी आणि कंपनी आणि इतर चार संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने रविवारी  कंपनीची कार्यालये आणि आरोपी संचालकांच्या निवासस्थानासह सहा ठिकाणी छापे टाकले.

सीबीआयने गुन्हा दाखल केला होता –

ऑगस्टा वेस्टलँड करारप्रकरणीदेखील पुरी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याआधी रतुल पुरी यांनी शुक्रवारी  ऑगस्टा वेस्टलँड  घोटाळा प्रकरणात त्यांच्याविरूद्ध जारी करण्यात आलेल्या अजामीनपात्र वॉरंटला रद्द करण्यासाठी दिल्ली कोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणी विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी शनिवारी सुनावणीसाठी तारीख निश्चित केली आहे .

रतुल पुरी यांनी कोर्टाला सांगितले की, आपल्याला तपासात सामील व्हायचे आहे, म्हणून त्यांच्याविरूद्ध जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करावे. कोर्टाने यापूर्वी पुरीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यावेळी ईडीने सांगितले की  पुरी पुराव्यांशी छेडछाड करू शकतात आणि साक्षीदारांवरही प्रभाव पाडू शकतात. हे त्यांनी यापूर्वीही केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –