रक्षाबंधनानिमित्त ‘मोदीं’ना राखी बांधण्यासाठी महिला ‘पाक’मधून दिल्लीत, म्हणाल्या मोदींचा ‘अभिमान’ वाटतो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुरुवारी देशभरात स्वातंत्र दिनाबरोबरच रक्षाबंधन साजरा करण्यात येईल. याचसाठी पंतप्रधान मोदींनी राखी बांधण्यासाठी एक खास व्यक्ती दिल्लीत दाखल झाली आहे. ही खास व्यक्ती आहे अहमदाबादच्या कमर जहाँ. मागील २४ वर्षांपासून कमर या नरेंद्र मोदींना न चुकता राखी बांधतात. कमर या मुळच्या पाकिस्तानच्या असून त्या मागील काही वर्षापासून अहमदाबादमध्ये राहतात.

मोदी बरोबर असलेले नाते सांगताना कमर म्हणाल्या की, सध्या पंतप्रधान असणारे नरेंद्र मोदी हे सामान्य कार्यकर्ता असल्यापासून मी त्यांना राखी बांधतेय. लोकांसाठी काम करायचे आहे याच उद्देशाने मोदींनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांची मेहनत, इमानदारी आणि मनापासून काम केल्यानेच मजल दरमजल करत आज ते भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. एक पंतप्रधान माझा भाऊ आहे याहून अधिक आनंदाची दुसरी कोणतीच गोष्ट नाही. इतक्या प्रतिभावान पंतप्रधानांची बहीण असल्याचा मला गर्व आहे.

आपण पंतप्रधान मोदींसाठी नेहमीच देवाकडे प्रार्थना करत असल्याचे सांगितले. यावेळी त्या म्हणाल्या की, मोदी मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मी देवाकडे प्रार्थना करायचे. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान व्हावे यासाठी देखील मी देवाकडे प्रार्थना केली. आता ते पंतप्रधान झाले आहेत तर मी त्यांना नोबेल पुरस्कार मिळावा म्हणून देवाकडे प्रार्थना करत आहे. प्रत्येक वेळेस माझ्या भावाला यश मिळावे अशीच प्रार्थना मी देवाकडे करते.

लाल किल्यावर मोदींच्या भाषणाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, यंदा मी १५ ऑगस्टच्या दिवशी पंतप्रधान मोदींना राखी बांधणार आणि नंतर लाल किल्ल्यावरुन त्यांचे भाषण ऐकणार. याचा आनंद यावेळी असेल.

एवढेच नाही तर पंतप्रधान मोदींना कमर यांनी खास भेट वस्तू घेतली आहे. परंतू ती भेटवस्तू काय आहे हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. त्या ही भेटवस्तू राखी बांधल्यावर मोदींना देणार आहेत. याशिवाय ३७० आणि ३५ अ रद्द् केल्यानंतर याचा देशाला येणाऱ्या काळात फायदा होईल असा विश्वास देखील कमर यांनी वक्त केला.

आरोग्यविषयक वृत्त –

 

Loading...
You might also like