कमला नेहरु रुग्णालयात आयसीयुसाठी प्रयत्न करणार :सदानंद शेट्टी  

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
”विकासकामे होतच असतात मात्र नागरिकांना विशेषतः गरीब वर्गाला आरोग्यविषयक सुविधाही  महत्वाच्या असतात. नेमकी ही गरज ओळखून पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात किमान २० खाटांचे अतिदक्षता विभाग उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे,” स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी सांगितले .
स्व.मातोश्री पदमावती कृष्णा शेट्टी यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रभाग क्रमांक १६ मधील महिलांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ व पुणे महानगरपालिका, अश्विनी महिला विकास संस्था , पदमकृष्ण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे स्वयंसहायता बचत गट निर्मिती कार्यशाळेचे उदघाटन नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी यांच्या पालिका कार्याचा [सन  २०१७- २०१८] वर्षपूर्ती अहवालाचे प्रकाशन प्रसंगी सदानंद शेट्टी यांनी कमला नेहरु रुग्णालयात ”आयसीयु”साठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

यावेळी  नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी यांच्या पालिका कार्याचा [सन  २०१७- २०१८] वर्षपूर्ती अहवालाचे प्रकाशन माजी नगरसेवक बुवासाहेब नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी, सिद्धांत शेट्टी, नितीन काळे, वैशाली भातकर, वंदना कवटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सदानंद शेट्टी म्हणाले की,”माजी नगरसेवक बुवासाहेब नलावडे आणि मी पालिकेच्या सभागृहात एकत्र काम केले. आज सुजाता शेट्टी या नगरसेविका आहेत. निवडणुकीत जे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता आम्ही केली आहे. प्रभागात काय काम केले, याचा जाब विचारण्याचा अधिकार नागरिकांना आहे, त्यानुसार आम्ही या अहवालाद्वारे विकासकामांची कामगिरी मांडत आहोत. यामध्ये त्यांनी ”आयसीयु सेंटरसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. नगरसेविका  सुजाता शेट्टी यांचे हे एक वर्ष पूर्ण झाले आहे अजून चार वर्षे बाके आहेत. याच आश्वासनांची पूर्ती झाली असली तरी झोपडपट्टी पुनर्वसन प्रश्न असो किंवा जुन्या वाड्यांच्या विकसनाचा सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी म्हणाल्या की,”आयसीयु सुरु करण्यासाठी आमच्या म्हणजे प्रभाग क्रमांक:१६ ‘क’मधून आम्ही एक कोटी रुपयांचा निधी वर्गीकरणाने उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.