कॅप्टन कूल विल्यमसनचं ‘फॅन’ झालं अख्ख जग, २०१४-२०१९ च्या दोन फोटांनी जिंकलं सर्वांच ‘मन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप आता संपला असून या स्पर्धेत यजमान इंग्लंडने विजय मिळवला आहे. मात्र फायनलमधील इंग्लंडच्या विजयानंतर मोठ्या प्रमाणात या विजयावर वाद देखील झाला होता. अनेक माजी खेळाडू आणि क्रीडा रसिकांनी यावर मोठी टीका देखील केली होती.

फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर ज्या पद्धतीने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवले होते. त्याच सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. पराभवानंतर ना कोणत्याही प्रकारचा राग, ना कोणत्याही प्रकारे वाद यामुळेच त्याने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली.

या स्पर्धेत विल्यमसन याला मालिकावीराचा ‘किताब देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर त्याने आपल्या फलंदाजीने आणि कर्णधारपदाच्या कौशल्याने देखील उत्तम कामगिरी केली. त्याच्या कामगिरीमुळेच सलग दुसऱ्यांदा न्यूझीलंड फायनलमध्ये पोहोचू शकला.

kane_071619100042.jpg

बेन स्टोक्स याच्या खांद्याला लागून चेंडू सीमापार जाऊन जो चौकार मिळाला त्याबद्दल विल्यमसनला विचारले असता यावर बोलताना तो म्हणाला कि, हे खूप दुर्दैवी आहे. मला आशा आहे कि, पुन्हा असे होणार नाही. संपूर्ण स्पर्धेत न्यूझीलंडच्या संघाने उत्तम कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये देखील त्यांनी अवघ्या २४० धावांचा बचाव करताना भारतासारख्या तगड्या संघाला पराभूत केले. या वर्ल्डकपमध्ये विलियम्सन याने ९ सामन्यांत ८२. ५७ सरासरीने ५७८ धावा काढल्या. यामध्ये २ शतकांचा आणि २ अर्धशतकांचा समावेश होता.

याआधी केले आहे मन जिंकणारे काम

केन विल्यमसन हा अतिशय शांत आणि उत्तम कर्णधार आहे. मात्र सामाजिक मदत आणि गरजुंना मदत करण्यामध्ये देखील तो खूप पुढे असल्याचे एका फोटोवरून दिसून येत आहे. २०१४ मध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या एकदिवसीय मालिकेनंतर त्याने पेशावर मधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या मुलांसाठी फंड जमवण्यासाठी आपली जर्सी आणि पाच सामन्यांत मिळालेलं मानधन या घटनेत जखमी झालेल्या मुलांच्या उपचारासाठी दिले होते.त्यानंतर आता वर्ल्डकप फायनल मध्ये झालेल्या पराभवानंतर सोशल मीडियावर त्याचे हे दोन फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी