अभिनेत्री कंगना रणौतचं मुंबईतील मीडियाबाबत पुन्हा एकदा ‘वादग्रस्त’ वक्तव्य !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –जजमेंटल है क्या’ सिनेमावेळी कंगना आणि पत्रकाराचा झालेला वाद काही थांबता थांबेना. या प्रकरणी लीगल नोटीस आणि ४५ पानांची तक्रार पाठवणाऱ्या कंगाना रणौतने मीडियाला घेऊन पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुंबईतील मीडियावर मुव्ही माफियांचा कंट्रोल आहे असे कंगना म्हणाली आहे.

एका वृत्तपत्राशी बोलताना कंगना म्हणाली की, “मीडियाने स्टार बनण्यासाठी मला खूप मदत केली आहे. मी जेव्हा मोठी स्टार झाले तेव्हा लोकांसाठी मला सहन करणं अवघड झालं. जेव्हा पण मी एखाद्या फिल्म स्टारच्या विरोधात बोलते मीडिया माझ्या विरोधात जातो. मुंबईचा मीडिया मुव्ही माफियांच्या कंट्रोलमध्ये आहे. सर्वांना हे माहीत आहे. मीडियात असे लोक आहेत जे या मुव्ही स्टार्ससाठी काम करतात. माझा मणिकर्णिका हा सिनेमाही दाबण्याचा प्रयत्न झाला.”

अँटीनॅशनलबद्दल बोलताना कंगना म्हणाली की, “तुम्हाला माझा सिनेमा आवडत नाही ठिक आहे, परंतु शहिदांची खिल्ली उडवणे मला सहन होत नाही. मला क्रिटीसिजमपेक्षा जास्त काहीच पसंत नाही. एक दिग्दर्शक म्हणून मी प्रत्येक गोष्ट वेगळ्या प्रकारे ट्रीट करू शकते. परंतु तसेच तुम्ही राणी लक्ष्मीबाईबद्दल नाही करू शकत. त्यांच्या नावाचा एक सन्मान आहे. तुम्ही त्यांच्या नावाला डिस्ट्रॉय करत तुमचं सेंस ऑफ ह्युमर दाखवत असाल तर हे मान्य नाही. हे चुकीचं आहे.”

ऋतिकचं म्हणणं होतं की, कंगना त्याला त्रास देते

ऋतिकच्या आरोपाला फेटाळत कंगना म्हणाली की, “तो होता ज्याने मला नोटीस पाठवली होती. हे लोक फिल्म फॅमिलीप्रमाणे राहतात. फरहान अख्तर, फराह खान, करण जोहरसहित अनेक कलाकार सोबत फोटो काढतात, रोज सोबत वेळ घालवतात. तुम्ही मला बघा. मी माझ्या कामात इतकी व्यग्र आहे की, कालच ‘पंगा’ची शुटींग पूर्ण केली. माझ्याकडे इतकं काम आहे की, मला हे सगळं करण्यासाठी वेळच नाही. तुम्ही कसं असं म्हणू शकता की, मी सर्वांना डिवचत असते. लोक माझे यश पाहून जळत आहेत.

रिलेशनशिपबाबत कंगना म्हणते…

रिलेशनशिपबाबत बोलताना कंगना म्हणाली की, “तुम्ही असा प्रश्न विचारून अडचणीत टाकता. माझ्याकडे रोमँससाठी वेळच नाही. माझ्या आयुष्यात खूप लोक आहेत, जे भलेही माझ्यासोबत भांडण करतात. परंतु मलाही वाटतं माझ्या आयुष्यातही एखादा चार्मिंग पर्सन असावा.”

 

किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ ३ घरगुती ड्रिंक्स

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !

 

Loading...
You might also like