Manikarnika : जो सिनेमा बनवताना मोडली कंगनाची हाडं, पडले होते तब्बल 20 टाके ! आता जपानमध्ये मोडलं कमाईचं रेकॉर्ड !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सोशलवर ती कायमच ॲक्टीव्ह असते. जेव्हा कधी तिला संधी मिळत असते, ती मणिकर्णिका सिनेमाचं कौतुक करताना दिसत असते. अलीकडेच तिनं मणिकर्णिका हा जपान मध्ये रिलीज झालेला यशस्वी भारतीय सिनेमा असल्याचं सांगत पुन्हा एकदा कौतुक केलं आहे. सिनेमाच्या रिलीजची 2 वर्षे पूर्ण करत कंगनानं ट्विट केलंय आणि हे सांगितलंय की, सिनेमाच्या शुटींगदरम्यान तिला काय काय अडचणी आल्या.

कंगनानं लिहिलं की, तो सिनेमा ज्यानं माझी हाडं मोडली. 20 टाके पडले आणि 2 फ्रॅक्चर झाले. परंतु सोबतच या सिनेमानं अनेक रेकॉर्ड तोडले. हाएस्ट वीकेंड, एका दिवसातच सर्वात जास्त कमाई, महिला केंद्रीत ब्लॉकबस्टर सिनेमांच्या लांबलचक यादीतील तिसरा सर्वात जास्त ग्रॉस कलेक्शन करणारा सिनेमा आणि जपानमध्ये रिलीज झालेला सर्वात यशस्वी भारतीय सिनेमा.

कंगनाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे. काही चाहते तिचं कौतुकही करत आहेत.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवी मध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.