Kangana Ranaut-Dawood Ibrahim | सिनेसृष्टीत नवी हिरोईन आली की आधी तिला दाऊदला…, कंगनाचं खळबळजनक वक्तव्य

मुंबई : Kangana Ranaut-Dawood Ibrahim | सिनेसृष्टीत नवी हिरोईन आली की आधी तिला दाऊदला सलाम करावा लागत असे. ही गोष्ट लपून राहिलेली नाही. मी ८० च्या दशकात जन्मले, त्या काळातील सर्व अभिनेते, अभिनेत्रींचे दाऊदबरोबर फोटो आहेत हे पाहायला मिळते. डॉनला एखादी मुलगी आवडली तर तिला तो घेऊन जायचा, असे खळबळजनक वक्तव्य अभिनेत्री आणि भाजपची मंडी, हिमाचल येथील उमेदवार कंगना राणावत हिने केले आहे. ती एका मुलाखतीमध्ये बोलत होती.

कंगना म्हणाली, कुठल्या कुठल्या अभिनेत्रींसह हे घडले हे सर्वांना माहीत आहे. मोनिका बेदी असेल किंवा इतर, मी सगळी नावे घेणार नाही पण हे सर्वांना ठाऊक आहे. माझ्या आई वडिलांसमोर हे सगळे चित्र होते. मी सिनेक्षेत्रात जायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना धक्काच बसला. तू त्या क्षेत्रात गेलीस तर आम्ही आत्महत्या करु असे ते म्हणाले होते. पण या सर्व गोष्टींमध्ये बदल झाला आहे. हा बदल २०१४ पासून झाला आहे.(Kangana Ranaut-Dawood Ibrahim)

कंगना म्हणाली, मला लोक कायम एक प्रश्न विचारतात की तुला अभिनेत्रीच व्हायचे होते का? मी त्यांना सांगते की माझे
असे काहीही स्वप्न नव्हते. मी असे काहीतरी करु इच्छित होते जे मनाला पटेल. मी रंगमंचावर काम केले, सिनेमात काम केले.
मात्र मी एकाही खान आडनाव असलेल्या व्यक्तीबरोबर काम केले नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PCMC News | मंगळसूत्र विकून, सोने गहाण ठेऊन पूर रेषेतील बांधकामांसाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप

Ravindra Dhangekar On Ajit Pawar | पोर्शे कार अपघातावरून धंगेकरांचा अजितदादांवर निशाणा, ”त्यांची भाषा सैल झालीय, फडणवीसांनी हातपाय बांधून खुर्चीत ठेवलंय” (Video)

Porsche Car Accident Pune | सुरेंद्रकुमार अग्रवालने ड्रायव्हरला खोलीत डांबले; ड्रायव्हरच्या बायकोने आरडाओरडा केल्यानंतर सुटका (Videos)