Kangana Ranaut | दादासाहेब फाळके पुरस्कारांबद्दल कंगना रणौतने नाराजी व्यक्त करत नेपोटीजमवर केली टीका; म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाईन : Kangana Ranaut | नुकताच मुंबईमध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा 2023’ पार पडला. भारतीय चित्रपट तसेच दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी आणि तिच्या सिनेसृष्टीतील योगदानासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर बॉलिवूड अभिनेता आणि आलियाचा पती रणबीर कपूरला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील शिवा या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. अभिनेता वरुण धवनने क्रिटिक्स बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार पटकावला. याबद्दल बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनं नुकतीच नाराजी व्यक्त केली आहे. हा पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangana Ranaut) एक पोस्ट शेअर करुन नेपोटिझमवर भाष्य केलं आहे.

कंगनाच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.“नेपो माफिया प्रत्येकाचा हक्क हिसकावून घेते” असं म्हणत कंगनाने पुरस्कार मिळालेल्या कलाकारांवर टीका केली आहे. तिनं पोस्टमध्ये लिहिलंय की, “नेपो माफिया दुसऱ्यांचा हक्क हिसकावून घेण्यापूर्वी मी तुम्हाला विजेत्यांची नावं सांगते, आणि पुढे तिने यावर्षी हे पुरस्कार कोणाला मिळायला हवे होते याची यादी जाहीर केली आहे. कंगना या पोस्ट मध्ये म्हणते “रिषभ शेट्टी यांना त्यांच्या ‘कांतारा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी यंदाचा उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळायला हवा होता तर उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ‘सीता रामन ’मधील मृणाल ठाकूर हिला हा पुरस्कार मिळायला हवा होता. ‘आरआरआर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून तर ‘द काश्मीर फाइल्स’ मधील अनुपम खेर यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून हा पुरस्कार मिळायला हवा होता, आणि तब्बूला ‘भूलभुलैया २’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळायला हवा होता.”

याबरोबरच कंगनाने आणखी एक पोस्ट करत नेपोटीजम आणि स्टारकिड्सवर निशाण साधला आहे.
कंगनानं लिहिलंय की, “नेपो किड्स हे आयुष्यभर त्यांच्या पालकांच्या नावाचा आणि ओळखींचा वापर करतात,
स्वतःला काम मिळवण्यासाठी वडिलांची खुशामत करतात, जर स्वतःच्या बळावर कोणी कलाकार पुढे आले,
तर त्यांचे करिअर नष्ट करतात. आणि या सगळ्यातून जर कोणाचं करिअर चांगलं सुरू असेल आणि ते त्यांच्यावर
होणाऱ्या गैरवर्तनाबद्दल बोलत असतील तर ते आमच्यावर जळतात किंवा वेडे आहेत अशी बदनामी हे
नेपो किड्स त्यांच्या माफिया पीआरच्या मदतीनं करतात. श्रीमद् भागवत गीता सांगते की, वाईटाचा नाश करणे,
हे धर्माचे प्रमुख ध्येय आहेत.” आणि अश्या वाईटाचा नाश झाल्यावरच आयुष्याचा आनंद घेता येतो.
कंगना (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी ‘इमर्जन्सि’ या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे.
या चित्रपटामध्ये कंगना ही इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा लेखन आणि निर्मिती कंगनानीच केली आहे.

Web Title :-  Kangana Ranaut | kangana ranaut speaks about dadasaheb phalke awards and slam nepokids shares her own list

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shiv Sena Party Office | विधीमंडळ पाठोपाठ संसदेतील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाकडे, राऊतांसह ‘या’ खासदारांना नो एंट्री!

IPS Sudhir Hiremath | पोलिस उप महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांची केंद्रीय अन्वेषण विभागात (CBI) नियुक्ती

Pune Kasba Peth Bypoll Election | चंद्रकांत पाटलांची ‘महाविकास’वर सडकून टीका; म्हणाले – ‘दिशाहीन काँग्रेसचा उमेदवार विधानसभेत जाऊन काय करणार?’