…म्हणून अभिनेत्री कंगना रणौतने दिला करिना कपूरला ‘होम मिनिस्टर’चा टॅग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत आपले विचार स्पष्टपणे मांडण्यामुळे प्रसिद्ध आहे. कंगना फार कमी प्रमाणात कलाकरांचे कौतुक करते पण कंगना करिना कपूरचा खूप आदर करते. नुकतेच कपिल शर्माच्या शोमध्ये कंगनाचे करिनाबद्दलचे मत ऐकायला मिळाले.

कपिल शर्माच्या शोचा एक प्रोमो व्हिडिओ कंगना रणौतच्या टीमने सोशल मिडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये कंगना करिना कपूर खानला होम मिनिस्टरचा टॅग देत आहे. यासोबतच कंगना करिनाचे खूप कौतुक केले आहे.

एका व्हिडिओमध्ये कंगना म्हणत आहे की, ‘करिनाने जसे आपले घर, मुलगा, परिवार आणि एक प्रोफेशनल करिअरमध्ये जेवढे यश मिळवले आहे. करिनापेक्षा बेस्ट कोणी होम मिनिस्टर होऊ शकते, असे मला वाटत नाही. करीना सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे.’

याआधी कंगना करिनाचे कौतुक करताना म्हणाली होती की, ‘आजच्या काळात अभिनेत्री, पत्नी, आईच्या या सगळ्या भूमिका पार पाडणारी फक्त करिना कपूर आहे. ती खूपच चांगली व्यक्ती आहे. मी तिला नेहमीच एका परफेक्ट महिलेच्या भूमिकेत बघत असते.’

अभिनेत्री कंगना रणौत कपिल शर्माच्या शोमध्ये अपकमिंग चित्रपट ‘जजमेंटल है क्या’ च्या प्रमोशनला आली होती, असा अंदाज लावला जात आहे. कंगनाचा हा एपिसोड या शनिवारी-रविवारी टेलिकास्ट होणार आहे.

कंगनाचा चित्रपट ‘जजमेंटल है क्या’ २६ जुलैला प्रदर्शित होणार आहे. कंगना सध्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहे. चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता राजकुमार राव दिसणार आहे. दोघेही एकत्र ‘क्विन’ चित्रपटात दिसून आले होते.

चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कोवेलामुडी यांनी केले आहे. ‘जजमेंटल है क्या’ मध्ये कंगना आणि राजकुमार राव व्यतिरिक्त जिमी शेरगील आणि अमायरा दस्तूर दिसणार आहे. या चित्रपटामध्ये कंगना बॉबी ग्रेवाल बाटलीवालाची भूमिका साकारणार आहे. ‘जजमेंटल है क्या’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडला आहे.

 

Loading...
You might also like