Kangana Ranaut ने उघड केले आपल्या आई-वडीलांच्या विवाहाचे रहस्य, म्हणाली – ’त्यांनी आम्हाला खोटे सांगितले की…’

नवी दिल्ली : बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणावत चित्रपटांसह आपल्या वैयक्तिक जीवनबाबत सुद्धा विशेष खुलासे करत असल्याने चर्चेत असते. ती आपल्या कुटुंबाबाबत अनेक गोष्टी सांगत असते. कंगना राणावतने आता आपल्या आई-वडीलांबाबत एक मजेशीर खुलासा केला आहे. तिने म्हटले की, तिच्या आई-वडीलांनी विवाहाबाबत मुलांना खोटे सांगितले होते आणि नंतर आजीने सत्य सांगितले होते.

ही गोष्ट कंगना राणावतने सोशल मीडियावर शेयर केली आहे. सोमवारी कंगना राणावत आपल्या आई-वडीलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत होती. यानिमित्त तिने आई-वडीलांच्या विवाहाचे एक खास छायाचित्र सोशल मीडियावर शेयर केले. सोबत तिने याबाबत मजेशीर खुलासा सुद्धा केला.

 

 

 

 

 

या छायाचित्रासोबत कंगना राणावतने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, आज माझ्या आई-वडीलांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. जेव्हा आम्ही मोठे होत होतो तेव्हा ते आमच्याशी खोटे बोलले की, त्याचे पारंपरिक अ‍ॅरेंज मॅरेज आहे, नंतर आम्हाला आजीने सांगितले होते की त्यांचे जबरदस्त अफेयर होते. पप्पांनी मम्मीला एका बस स्टँडवर पाहिले होते, ती कॉलेजवरून परतत होती. ते रोज त्याच बसने येऊ लागले, जोपर्यंत मम्मीने त्यांना नोटीस केले नाही. जेव्हा पप्पांनी प्रपोजल पाठवले तेव्हा आजोबांनी वाईट प्रकारे रिजेक्ट केले कारण पप्पांची प्रतिमा चांगली नव्हती.

कंगनाने पुढील ट्विटमध्ये लिहिले, आजोबांनी आईसाठी सरकारी नोकरीतील एक चांगला मुलगा शोधला होता. ती त्यांची लाडकी होती आणि लाडाने ते तिला गुड्डी बोलत असत, परंतु आईने सर्व अडचणींना तोंड दिले आणि आजोबांना समजावले. यासाठी धन्यवाद, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! सोशल मीडियावर कंगना राणावतचे हे ट्विट वेगाने वायरल होत आहे.