Sushant Birth Anniversary : ‘कंगना रणौतनं केले ‘असे’ Tweets ! लोक म्हणाले- ‘तुला लाज कशी वाटत नाही ?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची आज (गुरुवार, दि 21 जानेवारी) 35 वी बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी आहे. सुशांतचा जन्म 21 जानेवारी 1986 मध्ये पटण्यात झाला होता. सुशांतचे चाहते आज अनेक पोस्ट शेअर करत त्याची आठवण काढत आहेत. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिनंही त्याची आठवण काढत एक अनसीन व्हिडीओ शेअर केला होता. यानंतर आता बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) हिनंही या निमित्तानं काही ट्विट्स केले आहेत. यात तिनं यश राज, महेश भट आणि करण जोहर यांचा उल्लेख केला आहे. सुशांतच्या चाहत्यांना नेमकी हीच गोष्ट आवडली नाही. याबद्दल त्यांनी राग व्यक्त केला आहे.

कंगनाचा मुव्ही माफियांवर पुन्हा निशाणा

कंगनानं एका ट्विटमध्ये लिहिलं की, डिअर सुशांत मुव्ही माफियांनी तुझ्यावर बंदी घातली. तुला त्रास दिला. सोशलवर तू खूपदा मदत मागितली. मला आजही वाईट वाटतं की, मी तुला साथ देऊ शकले नाही. तू स्वत: त्या माफियांविरोधात लढू शकतोस असा विचार मी करायला नको होता. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

यश राज आणि करण जोहरवर साधला निशाणा

कंगना आणखी एका ट्विटमध्ये म्हणाली, सुशांतनं सांगितलं होतं की, यश राज फिल्म्सनं त्याच्यावर बंदी घातली होती. हे कधीही विसरू नका. करण जोहरनं त्याला मोठी स्वप्न दाखवली. त्याला फ्लॉप सिनेमे दिले. यानंतर जगभरात सुशांत हा एक फ्लॉप अभिनेता आहे असं सांगत फिरला. हे विसरू नका की, महेश भट यांची सर्व मुलं डिप्रेशन मध्ये होती. पण तरीही सुशांतसाठी म्हणायचे की, त्याचा परवीन बाबी प्रमाणे मृत्यू होईल. या सर्व लोकांनी मिळून सुशांतला मारलं. सुशांतनं स्वत:च सोशल मीडियावर या सर्व गोष्टी लिहिल्या होत्या. हे कधीही विसरू नका.

‘सुशांतचा दिवस सेलिब्रेट करा’

आणखी एका ट्विटमध्ये कंगनानं लिहिलं की, या गोष्टींच्या पलीकडे जाऊन सुशांतचा दिवस आनंदानं साजरा करा. तुम्ही चांगले नाही हे असं कुणालाही सांगू देऊ नका. स्वत:पेक्षा जास्त कोणावर विश्वास ठेवू नका. त्या लोकांपासून दूर रहा जे तुम्हाला ड्रग्ज हाच एक उपाय असल्याचं सांगतात आणि तुमचं मानसिक आणि आर्थिक शोषण करतात.

कंगनाच्या ट्विट्स नंतर संतापले चाहते

सुशांतचे चाहते आणि सोशल मीडिया युजर्स यांनी कंगनाच्या या ट्विट्सवर आक्षेप घेतला आणि संताप व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर अनेकांनी असा सवाल केला आहे की, सुशांतनं हे सर्व कधी सांगितलं. काहींनी तर यामुळं नाराजी व्यक्त केली आहे की, कंगनानं सुशांतच्या वाढदिवशी अशा नकारात्मक गोष्टी ट्विट ट्विट केल्या आहेत.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवी मध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.