Kantara Movie | ‘कांतारा’ पाहून रजनीकांत यांच्या अंगावर आला काटा! चित्रपटासाठी लिहिली भावूक पोस्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) दिग्दर्शित ‘कांतारा’ हा चित्रपट (Kantara Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता महिना होत आला आहे. मात्र त्याची क्रेझ सोशल मीडियावर अद्याप कायम आहे. ‘कांतारा’ चित्रपटाचे (Kantara Movie) कौतुक बॉलिवूडमधील (Bollywood) कलाकारांनी देखील केले आहे. या चित्रपटाचे कौतुक ‘थलायवा’ (Thalaiva) सुपरस्टार रजनीकांत (Superstar Rajinikanth) यांनीसुद्धा केले आहे. रजनीकांत यांनी ट्विट करत ‘कांतारा’ला ‘मास्टरपीस’ असं म्हटलं आहे.

काय लिहिले ट्विटमध्ये?

‘माहीत असण्यापेक्षा माहीत नसलेले अधिक महत्त्वाचं असतं.
‘कांतारा’ या चित्रपटात (Kantara Movie) या गोष्टीची प्रचिती येते.
या चित्रपटाने माझ्या अंगावर अक्षरश: काटा आणला. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते ऋषभ शेट्टी यांना माझा सलाम.
भारतीय सिनेसृष्टीतील हा एक मास्टरपीस आहे.
या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन’, असं ट्विट रजनीकांत यांनी केले.

सुरुवातीला कांतारा हा चित्रपट फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता.
यानंतर चित्रपटाचा वाढता प्रतिसाद पाहता अखेर निर्मात्यांनी इतर भाषांमध्ये त्याचा डबिंग करण्याचा निर्णय घेतला.
कांतारा या कन्नड चित्रपटाला कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.
या वर्षभरात आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत कांतारा सध्या आठव्या स्थानी आहे.

Web Title :- Kantara Movie | rajinikanth calls kantara a masterpiece heaps praises over rishab shetty you gave me goosebumps

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bacchu Kadu | बच्चू कडू यांनी निर्वाणीचा इशारा देताच शिंदे गटात वेगवान हालचाली, दीपक केसरकरांनी केलं सूचक विधान

MY Rikshawala App | ‘ओला’, ‘उबर’शी स्पर्धा करणार ‘बघतोय रिक्षावाला’चे ‘माय रिक्षावाला’ अ‍ॅप; कामगार संघटनेने स्वत:चे स्टार्टअपच्या माध्यमातून देशात प्रथमच तयार केले अ‍ॅप्लिकेशन

Raosaheb Danve | मनसे म्हणजे फटाक्याची लड, फुटायला लागली की थांबत नाही पण फायदाही होत नाही, दानवेंनी पवार, शिवसेनेला दिली ‘ही’ उपमा