भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री ?

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक निवडण्यासाठी प्रशासक समितीने (सीओए) नियुक्त केलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) हे स्पष्ट केले आहे की ते या पदासाठी परदेशी प्रशिक्षक निवडणार नाहीत. अशा परिस्थितीत भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची फेरनिवड निश्चित मानली जात आहे. माजी कर्णधार कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्यासह प्रशिक्षकांची नेमणूक करण्यासाठी सीओएने तीन सदस्यीय सीएसी नेमली आहे.

सीएसीच्या सदस्याने सांगितले की, शास्त्री यांच्या देखरेखीखाली टीम चांगली कामगिरी करत आहे. अशा परिस्थितीत शास्त्री पुन्हा एकदा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम करणार आहेत हे जवळपास निश्चित झाले आहे. सीएसी सदस्याने सांगितले की, “आम्ही परदेशी प्रशिक्षक नेमण्याच्या बाजूने नाही. होय, गॅरी कर्स्टन सारख्या एखाद्या व्यक्तीने या पदासाठी अर्ज केला असता तर आम्ही त्याबद्दल विचार करू शकलो असतो, परंतु भारतीय प्रशिक्षकाला नेहमीच आमचे प्राधान्य राहिले आहेत.

सद्य परिस्थितीत बदल करून नव्या व्यक्तीला संधी दिल्यास भारतीय संघाच्या रणनीतीमध्ये बदल होईल. हा बदल आगामी ५ वर्षांसाठी असेल. त्यामुळे सर्वांची इच्छा नसताना बदल करणे भारतीय संघावर अन्याय करणारे ठरेल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या निवडीसंदर्भात क्रिकेट सल्लागार समितीने घेतलेला निर्णय अंतिम असेल आणि बीसीसीआयला शिफारस करण्याची आवश्यकता भासणार नाही, असे क्रिकेट प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय यांनी स्पष्ट केले.

आरोग्यविषयक वृत्त –