MLA Ravi Rana | आमदार रवी राणा यांनाही अश्लिल शिवीगाळ करीत ठार मारण्‍याची धमकी

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Ravi Rana | गेल्या काही दिवसापासून राज्यात धमकीचे (Threat) फोन फिरत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar), खासदार संजय राऊत (Sanjay Raut), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आदी नेत्यांना धमकी देण्यात आली आहे. अशातच आता बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना देखील धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे.

आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील एका व्‍यक्‍तीने अश्लिल शिवीगाळ करीत ठार मारण्‍याची धमकी दिल्‍याची तक्रार रवी राणा यांच्‍या स्‍वीय सहायकाने येथील राजापेठ पोलीस ठाण्‍यात (Rajapeth Police Station) नोंदविली आहे. रवी राणा यांच्‍या मोबाईलवर संभाजीनगर येथील एका व्‍यक्‍तीने संपर्क साधला. महाराष्‍ट्रात फिरणे बंद करा, अन्‍यथा तुमच्‍या जिवाचे बरेवाईट करू, अचानक काही घडले किंवा अपघात झाला, तर काही म्‍हणू नका. तुमच्‍यावर मी व माझे कार्यकर्ते लवकरच हल्‍ला करणार आहे. तुम्‍हाला आम्‍ही सोडणार नाही. आमच्‍या विरोधात कसे काय बोलता, हे आम्‍ही अमरावतीत येऊन दाखवून देऊ. आता थांबले नाही, तर तुम्‍हाला संपवून टाकू, अशा धमक्‍या दिल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे.

रवी राणा यांचे स्‍वीय सहायक विनोद गुहे (Vinod Guhe) यांनी राजापेठ पोलीस ठाण्‍याच्‍या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर (Police Inspector Seema Datalkar) यांच्‍याकडे याबाबत लेखी तक्रार (Complaint) दाखल केली आहे. धमकी देणाऱ्या व्‍यक्‍तीला तत्‍काळ अटक (Arrested) करावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

Web Title :  MLA Ravi Rana | death threat to mla ravi rana filed a complaint with the police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा