अभिनेत्री कृति सेननच्या ‘स्टारडम’मुळे तिच्या आई-वडिलांना येथे वाटली ‘लाज’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अभिनेत्री कृति सेनन आणि दिलजीत दोसांझचा अर्जुन पट‍ियाला हा बहिचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या दिवसांमध्ये कृति चित्रपट अर्जुन पटियालाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. नुकतीच ती चित्रपट प्रमोट करण्यासाठी कपिल शर्माच्या शो मध्ये आली होती. कृतिसोबत शो मध्ये स्टार दिलजीत दोसांझ देखील आला होता.

कपिलच्या शो मध्ये कृतिने तिच्या जीवनातील अनेक गोष्टी सांगितल्या. कृतीने शो मध्ये सांगितले की, ती सेलेब्रिटी असल्याकारणामुळे स्टोर मध्ये शॉपिंग करतांना तिच्या आई-वडिलांना कशा प्रकारे लाजिरवाणे वाटत होते.

कपिलच्या शो मध्ये तिच्या आईने सांगितले की, एका स्टोर मध्ये ५०% डिस्काउंट चालू होते, आणि तिथे शॉपिंग करण्यासाठी ती गेली. परंतु तिथल्या लोकांनी तिला ओळखले आणि तिथे असल्येला लोकांनी चर्चा करायला सुरवात केली की, ती कोणत्या शॉप मध्ये शॉपिंग करण्यासाठी आली आहे. त्या पुढे म्हणाल्या, ‘हमें अच्छा लगता है अगर कुछ जगहों पर लोग हमें पहचानते नहीं हैं.’ तसेच त्यांनी कृतिला वेगळं जाण्यासाठी सांगितले कारण ती आरामात मॉल मध्ये फिरू शकेल.

आरोग्यविषयक वृत्त –