पुण्यातील महिलेवर बलात्कार व फसवणूकप्रकरणी गणेश गोडसे गजाआड

कराड : पोलीसनामा ऑनलाईन- पुणे येथील महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार करून तिची आर्थिक फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कथित कुंडलीतज्ज्ञ गणेश गोडसे यास कराड पोलिसांनी अहमदनगरजवळ पकडून गजाआड केले. संशयीत गोडसे हा नेपाळमधून परतल्यानंतर कुटूंबासह कराडकडे येत असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, गणेश गोडसे रा. विद्यानगर, कराड याला पोलिसांनी येथील न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पिडीत महिला रेल्वेने प्रवास करत असताना तिची २०१६ मध्ये गणेश गोडसे याच्यासोबत ओळख झाली होती. त्यावेळी गोडसे याने तिला आपण कुंडलीतज्ज्ञ असून तुमच्या अडचणी सोडवू शकतो, असे सांगितले होते. तसेच तिला स्वत:चा मोबाईल नंबर दिला होता. तिचा संपर्क झाल्यानंतर त्याने तिला विद्यानगर येथील फ्लॅटवर बोलावून घेतले. अडचणी सोडवायच्या असतील तर मी सांगतो तसे वागावे लागेल, असे म्हणत त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार तिच्यावर अत्याचार केले.


नगरच्या महापौर सुरेखा कदम यांच्या विरोधात याचिका

गोडसे यानेच पिडीत महिलेची ओळख त्याचा मित्र प्रा. संपत अडसूळ यांच्याशी करून दिली होती. तसेच प्रा. अडसूळ याला पैशांची गरज असल्याचे सांगून तिला तिच्याकडील पैसे देण्यास सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून पिडीत महिलेने पैसे दिले, मात्र प्रा. अडसूळ याने पैसे परत दिले नाहीतच मात्र नडशीचा सावकार अनिल थोरात याने हे पैसे देतो, असे सांगत तिच्यावर जबरदस्तीने दोन वेळा बलात्कार केला. या दरम्यान, गोडसे याने पिडीत महिलेला एका कागदपत्रावर सही करून जा, असे म्हणत विद्यानगर येथील फ्लॅटवर बोलवले. तेथे गोडसे व आकाश सावंत या दोघांनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला, अशी फिर्याद पिडीत महिलेने पोलिसांत दिली.