सुशांतसाठी करण जोहरची ‘भावूक’ पोस्ट, म्हणाला – ‘मी स्वत:ला तुझ्या मृत्यूसाठी दोषी मानतो कारण…’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. फिल्ममेकर करण जोहर यानंही सोशलवर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. करण आतून खूप तुटला आहे.

करणनं इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात करण म्हणतो, “मी स्वत:ला तुझ्या मृत्यूसाठी दोषी मानत आहे कारण मी तुझ्या टचमध्ये नव्हतो. मला जाणीव आहे की, तुला किती गरज होती की, आमच्या सर्वांसोबत तुझ्या आयुष्यातील गोष्टी शेअर करू शकत होता. परंतु मी हे सगळं नाही करू शकलो. मी नेहमी ही चूक लक्षात ठेवेन.”

करण पुढे म्हणतो, “आपण नाते फक्त जोडायलाच नाही पाहिजे तर ते निभवायला पाहिजे. आज सुशांत मला खूप शिकवून गेला की, प्रत्येक नातं सांभाळायला हवं. तुझी स्माईल आणि गळाभेट घेण्याचा अंदाज कायम लक्षात ठेवेन.” सुशांतच्या जाण्यानं करण जोहर आतून खूप तुटला आहे.