‘गर्ल गँग’ सोबत गौरी खानची प्रायव्हेट ‘बॅश’, करण जोहरच्या लुकपुढे साऱ्याच ‘फेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार किंग खानची पत्नी गौरी खान नुकतीच आपल्या गर्ल गँगसोबत एका पार्टीत आली होती. ही पार्टी तिच्या खास मैत्रिणीनं ठेवली होती. जैसलमेरमध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत करण जोहर, गौरी खान, मलायका अरोरा, नेहा धुपिया, अंगद बेदी यांसारखे कलाकार आल होते. या पार्टीत करण जोहरनं सर्वांचं लक्ष वेधलं. आपल्या लुकनं त्यानं गर्ल गँगलाही मागे टाकलं.

करण जोहर या पार्टीत ब्लॅक डॅपर लुकमध्ये दिसला. करणनं इंस्टग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. सोबतच करणनं त्याचा मित्र अरविंदला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. करण म्हणतो, “माझा प्रिय मित्र अरविंद आज 50 वर्षांचा झाला आहे.”

https://www.instagram.com/p/B2uf0JSBLR1/

करण जोहरच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर त्यानं खूपच रॉयल लुक केला होता. त्यानं ब्लॅक कोटवर एक ब्लॅक श्रगही घेतला होता. यावर गोल्डन एब्रॉयडरी होती. ग्रुपचे फोटो पाहिल्यानंतर लक्षात येतं की, करण एका वेगळ्याच लुकमध्ये दिसत आहे. ब्लॅक आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन करत करणनं खूपच चांगल्या प्रकारे आपला लुक कॅरी केला होता.

आपला लुक कम्प्लिट करण्यासाठी करणनं एक गोल्डन लॉकेटही घातलं होतं. यावर त्यानं गोल्डन स्पेक्ट्सही घातले होते जे त्याला खूप सूट करत होते. सर्वांना करणचा हा लुक खूप आवडला.

करणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आगामी सिनेमा तख्तमुळे करण सध्या चर्चेत आहे.